कुसुंबे ता.रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दी.२३/४/२०२३ रोजी दुपारी अचानक झालेला अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह विजतारांवर झाड पडल्याने व विजतरा तुटुन पडल्याने शेतशिवारातून घरी जात असलेला शेतकरी नामे आनंदा उघडू महाजन वय ६५ वर्ष रा.कुसुंबा बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगाव(Kusumbe Bk Taluka Raver Dist Jalgaon) हे गंभीर जखमी झाले असून[ads id="ads2"]
त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन त्यांचे मालकीची सुमारे दीड लाख रुपये किंमतीची बैलजोडी जागीच ठार झाली असुन ऐन मशागतीच्या दिवसांत या गरीब शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला शासनाने व प्रशासनाने लागलीच नुकसान भरपाई द्यावी अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी
हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश
हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर : जनधन बँक खाते असेल तर मिळणार "इतके" रुपये
हेही वाचा:- 60 वर्षीय वृद्धास लक्झरीने चिरडले ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना