मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 19 एप्रिलपासून टपाल केंद्र सुरू करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

 


महाराष्ट्र राज्य सरकारचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील (Mantralaya) सर्व प्रशासकीय विभागात ई-ऑफिस (eOffice) होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.याचाच भाग म्हणून 19 एप्रिलपासून मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती टपालकेंद्र (postal centre) सुरू होत आहे. मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी हे टपाल केंद्र सुरु करण्यात येणार आहे. नागरिकांचे टपाल, निवेदने स्वीकारून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.[ads id="ads1"]  

वेळेचा अपव्यव टाळण्यासाठी टपाल केंद्र

शासनाचा कारभार हा लवकरच कागद विरहित (Paperless) करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिली. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरिकांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे टपाल स्वीकारण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये प्राप्त होणाऱ्या टपालांवर तत्काळ कार्यवाही व्हावी आणि वेळेचा अपव्यव टाळण्यासाठी टपाल केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई- ऑफिसच्या माध्यमातून पाठविण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. केवळ नागरिकच नव्हे तर क्षेत्रीय कार्यालयातून येणारे दैनंदिन टपाल देखील या ठिकाणी स्वीकारण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.[ads id="ads2"]  

आपले सरकार वेब पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना 387 सेवा

नोंदणी शाखेस ई-ऑफिस (e-office) प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून कामकाज करणे अपरिहार्य आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशे, पुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाही, असे टपाल समक्ष स्वीकारले जाईल अशी माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान, आपले सरकार या वेब पोर्टलच्या माध्यमातून 511 सेवा पैकी 387 सेवा नागरिकांना दिल्या जातात. शासनाच्या जास्तीत जास्त सेवा लोकाभिमुख करण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये 124 सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना आपले अर्ज दाखल केल्यापासून सेवा सहज मिळाव्यात यासाठी मोबाईल ॲप देखील सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️