साक्री पोलिसांची दमदार कामगिरी; अट्टल घरफोड्यास अटक करून सुमारे ३लाख ४० हजार ८५०रुपयाचा मुद्देमाल केला हस्तगत


साक्री जि.धुळे (अकिल सादिक शहा) : साक्री पोलीस स्टेशन हद्दीत सन २०२३ मध्ये साक्री परिसरातील अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याने साक्री पोलीस स्टेशन येथील १) अपराध क्रमांक ०२/२०२३ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०, २)  अपराध क्रमांक ०८/२०२३ भादवी कलम ४५७, ३८०, ३) अपराध क्रमांक २९/२०२३ भादवी कलम ३८०, ४५० ४) अपराध क्रमांक ३५/२०२३ भादवी कलम ४५४, ३८०, ५) अपराध क्रमांक ४७/२०२३ भा.द.वि. कलम ४५७ ३८०, ६) अपराध क्रमांक ५२/२०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे असे गुन्हे दाखल झाल्याने मा. पोलीस अधिक्षक श्री. संजय बारकुंड साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री किशोर काळे , उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साक्री श्री प्रदिप मैराळे  यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख साक्री पोलीस स्टेशन येथील पोसई/रोशन विजय निकम, पोसई/ प्रसाद दिलीप रोदंळ, असई, कैलास रामदास पाटील, असई अशोक निंबा पाटिल, पोहेकॉ ७११ संजय गोकुळ शिरसाठ, पोना/२३ अनिल संभाजी शिंदे पोना/१४८१ शांतिलाल छोटू पाटील, पोकॉ/९९७ जगदिश यशवंत अहिरे, पोकॉ/१६६७ रोहन सुरेश वाघ यांचे पथक तयार करून त्याना योग्य मार्गदर्शन करून सदर आरोपी यांचा शोध घेवून त्यांचेकडून गुन्हयांचे संदर्भात माहीती काढणे कामी रवाना केले असता. [ads id="ads1"] 

साक्री पोलीस स्टेशन येथील हिस्ट्रीशिटर विजय रमेश दाभाडे वय-२९ वर्ष रा. इंदिरानगर भाडणे, ता-साक्री जि.धुळे यांस पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्याने साक्री पोलीस स्टेशन हद्दीतील दहिवेल, दिघावे, कासारे, साक्री येथे घरफोडी केल्याचे कबुली देवून नमुद गुन्हयात अटक करण्यात आली.[ads id="ads2"] 

सदर आरोपी मजकुर यांचे कडून खालील नमुद गुन्हयात मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला साक्री पोलीस स्टेशन अपराध क्रमांक ०८/२०२३ भादवी कलम ४५७, ३८० मध्ये १०,०००/- रु. रोख, ५२ / २०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० मध्ये १०,०००/- रु रोख अपराध क्रमांक ४५/२०२३ भादवी कलम ४५७, ३८० मध्ये १,५०,००० रु किमतीचे २५ गॅम वजनाची सोन्याची लगड गोळी २) ७०,८५० रु किमंतीचे ९.२१० ग्रॅम वजनाची व एक ४.९६० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड लॉट आकार असलेली. सदर आरोपीताकडून एकुण २,४०,८५०/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

 साक्री पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल साक्री व परिसरातील नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️