मधमाश्यांने केलेल्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी :जळगाव जिल्ह्यातील घटना



जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रोजंदारीचे काम करून घराकडे निघालेल्या पिता-पूत्रांवर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यानंतर 58 वर्षीय प्रौढाचा मृत्यू ओढवला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा (Nagardeola,Taluka Pachora) गावाजवळील शिंदोळ रस्त्यावर घडली.[ads id="ads1"]  
या घटनेत सैय्यद सबदर सैय्यद ईस्माईल (वय-58 वर्ष नगरदेवळा,ता.पाचोरा जिल्हा जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा सैय्यद आबीद हा जखमी झाला.
सैय्यद सबदर सैय्यद ईस्माईल (वय 58, नगरदेवळा, ता.पाचोरा) व त्यांचा मुलगा सैय्यद आबीद हे शेतात रोजंदारी कामावरून घराकडे नगरदेवळा येथे परतत असताना वडाच्या झाडावर बसलेल्या मधमाशांचा पोळ अचानक उठल्यानंतर मधमाशांनी डंख मारणे सुरू केल्याने सफदर यांचा जागीच मृत्यू ओढवला त्यांचा मुलगा सैय्यद आबीद हा जखमी झाला.[ads id="ads2"]  
  अत्यवस्थ अवस्थेत त्यास पाचोरा येथे हलवण्यात आले व तेथून जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मयत सैय्यद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा असा परीवार आहे. त्यांच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने शासनाकडून त्यांच्या परिवारास आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.

मधमाश्यांने केलेल्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️