अज्ञात वाहनाच्या धडकेत रावेर तालुक्यातील केळी मजूर कामगाराचा जागीच मृत्यू ;


रावेर (मुबारक तडवी) अंकलेश्वर - ब-हानपुर चांगला महामार्गावरील सावदा - रावेर रस्त्यावर  मोठा वाघोदा तालुका रावेर येथील सुकी नदी पुलाजवळील जयदीप पेट्रोलियम च्या पुढे सुसाट वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटारसायकल स्वारास थडक देत रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक (Waghode Bk Taluka Raver) येथील रहिवाशी ३२ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात(Savda Police Station)  अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनुस उर्फ पिंटू इतबार तडवी (वय ३२) रा.मोठा वाघोदा बुद्रुक ता. रावेर (Mothe Waghode Tal Raver) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.[ads id="ads1"] 

याबाबत अधिक माहिती अशी की, युनूस तडवी हा आई, पत्नी व दोन मुलांसह रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक (Waghode Bk Taluka Raver) येथे वास्तव्याला होता. शेतात केळी मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता रविवारी २३ एप्रिल रोजी युनूस सायंकाळी ६ वाजता दुचाकी (एमएच १९ बीबी ०३९५) ने सासरवाडी वडगाव तालुका रावेर येथे गेला होता तेथून परतत असतांना मोठा वाघोदा ते रावेर (Mothe Waghode -Raver) रस्त्यावर असलेल्या बाळू श्रावण महाजन यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने युनूस तडवीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. [ads id="ads2"] 

  या धडकेत युनूस हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक हा अंधारात वाहन घेवून पसार झाला. ही बाब युनूसचे काका हमीद हसन तडवी यांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असतांना पुतण्याचा मृतदेहपाहून हंबरडा फोडला. रावेर ग्रामीण रूग्णालयात (Raver Rural Hospital) मृतदेह नेण्यात आला. 

हेही वाचा :- वादळाच्या तडाख्याने विजतारा पडल्याने दोन बैल दगावले व शेतकरी गंभीर जखमी ; रावेर तालुक्यातील घटना

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी 

हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर :  जनधन बँक खाते  असेल तर मिळणार "इतके" रुपये

हेही वाचा:- 60 वर्षीय वृद्धास लक्झरीने चिरडले ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना

याप्रकरणी हमीद तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत युनूसच्या पश्चात आई जैनब तडवी, पत्नी काजल आणि दोन मुले असा परिवार आहे.पुढील तपास सपोनि जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद पाटील हे तपास करीत आहेत तर घटनास्थळी पो कॉ संजय चौधरी मजहर पठाण रविंद्र महाजन विनोद तडवी आदींनी पंचनामा केला.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️