लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र च्या विदर्भ संघटक पदी शाहिर किशोर मैँद यांची नियुक्ती

 


गजेंद्र गवई (बुलढाणा प्रतिनिधि)

महाराष्ट्रभर प्रचलित असलेल्या विविध पारंपारिक लोककला,त्यांचे जतन, संवर्धन,संशोधन, सादरिकरण करणारे लोककलावन्त यांचे राज्यव्यापी लोककलावंतांचे संगठन म्हणजे लोककलावंत प्रबोधन परिषद,महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघठनेचे विदर्भ संघटक म्हणून मेहकर चे लोककलावन्त शाहिर किशोरभाऊ मैंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.[ads id="ads1"]  

लोकशाहीर किशोरभाऊ मैँद हे मेहकर शहरातील प्रसिद्ध भांडयाचे व्यापारी असुन ,जनमानसात परिचित आहेत. सिद्धिविनायक बहुउद्देश्यीय लोककला मंडल,मेहकर च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून प्रबोधनात्मक प्रचार प्रसाराचे कार्य करित आहेत,तसेच ते शासनाच्या लोककलावन्त मानधन योजनेचे पात्र कलावन्त आहेत.[ads id="ads2"]  

लोककलेच्या बद्दल ची आवड़ व व्यासंग् लक्षात घेऊन लोककलावन्त प्रबोधन परिषद,महाराष्ट्र चे राज्य समन्वयक प्रा गजेंद्र गवई यांचे शिफ़ारशिने लोककलावन्त प्रबोधन परिषद, महाराष्ट्र  चे संस्थापक अध्यक्ष  शाहिर सम्राट सुभाष गोरे,(सोलापुर), संस्थापक सचिव शाहिर बालासाहेब मालुसकर(पुणे) राज्य कार्याध्यक्ष शाहिर डी आर इंगले(बुलडाणा) यांनी शाहिर किशोरभाऊ मैंद यांची विदर्भ संघटक म्हणून नियुकि केली आहे,सम्पूर्ण विदर्भ भर जिल्हा,तालुका व गाँवोगावी लोककलावंताना संघठित करून कार्यकारणी गठित करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे.सदर महत्वपूर्ण पदी नियुक्ती झाल्यामुळे शाहिर किशोरभाऊ मैँद यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️