चार हजाराची लाच भोवली ; रावेर तालुक्यातील "या" गावातील कोतवालासह,तलाठी एसीबीच्या सापळ्यात



रावेर प्रतिनिधी/मुबारक तडवी

रावेर चे नविन तहसीलदार (Raver Tahsildar) बंडू कापसे यांनी एका दिवसाआधीच पदभार स्वीकारला आणि दुसर्याच दिवशी कार्यक्षेत्रात तलाठी वर एसीबीची कारवाई 

 रावेर तालुक्यातील खिरोदा (Khiroda Taluka Raver) येथील तलाठी यांनी सातबारा उतार्यावर वारसांच्या नोंदणीसाठी चार हजार लाच स्वीकारताना तलाठी सह कोतवाल एसीबीच्या सापळ्यात [ads id="ads1"]  

चार हजार रुपयांची लाच मागण्यासह ती स्वीकारणा-या तलाठ्यासह कोतवालास जळगाव एसीबीच्या (Jalgaon ACB)  कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आज आली. प्रमोद प्रल्हाद न्हायदे असे रावेर तालुक्याच्या खिरोदा (Khiroda,Raver)येथील तलाठ्याचे आणि शांताराम यादव कोळी असे कोतवालाचे (Kotwal) नाव आहे. सात बारा (Saat Bara Utare) उता-वार तक्रारदाराच्या मयत भावाची पत्नी आणि मुलगा यांचे नाव लावण्याच्या बदल्यात चार हजाराची लाच तक्रारदाराकडून मागण्याचे काम तलाठी (Talathi) व कोतवाल (Kotwal) या दोघांनी केले होते. तसेच लाचेची मागणी स्वीकारण्याचे काम तलाठी न्हायदे यांनी कोतवालासमक्ष खिरोदा तलाठी कार्यालयात केले.[ads id="ads2"]  

लाचेची मागणी आणि स्वीकार होताच एसीबी(ACB)  पथकाने दोघांना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरु केली. पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एस. के. बच्छाव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. जनार्दन चौधरी, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

हेही वाचा:- यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत अनुभवी असलेल्या बड्या मातंबराचे तीन नामांकन अवैध

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️