पुणे जिल्हा प्रतिनिधी (शुभम वाकचौरे ) जांबुत: येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष भंडार खोबऱ्याची उधळण करीत मोठ्या उत्साहात जांबुत ता शिरूर येथील यात्रा उत्सव संपन्न झाला.जांबुत ( तालुका : शिरूर )येथे शनिवारी (दिनांक 22 )रोजी ग्रामदैवत खंडोबा देवाची यात्रा नुकतीच संपन्न झाली या यात्रा उत्सव निमित्ताने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]
यावेळी पार पडलेल्या शर्यतीमध्ये सुमारे दीडशेहून बैलगाड्याने सहभाग घेतला होता यावेळी आयोजित बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार माजी संचालक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते संपन्न झाला.[ads id="ads2"]
संपन्न झालेल्या बैलगाडा शर्यती मध्ये स्व.सचिन भंडलकर (राजगुरुनगर) यांचा बैलगाडा घाटाचा राजा ठरला तर फळीफोड होण्याचा मान कृष्णा मेरगळ (जांबुत ) यांना मिळाला फायनलसाठी मयूर डुकरे ( पारगाव ) संगीता रोडे ( फाकटे ) स्व सचिन भंडलकर (राजगुरुनगर)कृष्णा मेरगळ (जांबुत ) शिवाजी जोरी (जांबूत) कचर पानमंद (चांडोह) दिपक गाजरे ( जांबुत ) हे फायनलचे मानकरी ठरले यावेळी या बैलगाडा मालकांना सुमारे दोन लाख तीस हजार रुपये इनाम स्वरूपात देण्यात आले बक्षीसाचे वितरण करण्यात आले यात्रा कमिटी चे अध्यक्ष दत्तात्रय जोरी व उपाध्यक्ष गोरक्ष गाजरे यांनी सांगितले आम्रपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम संपन्न झाला व तसेच तसेच कुस्त्यांच्या आखाड्यासाठी पुणे नगर जिल्ह्यातील पैलवान सहभागी होते. या यात्रेनिमित्त माजी आमदार पोपटराव गावडे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचरणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर डॉ सुभाष पोकळे या मान्यवरांनी भेटी दिल्या..