शुभम वाकचौरे (पुणे जिल्हा प्रतिनिधी) त्रिरत्न मेत्रेय सेवा संघ, जांबुत यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले ,राजश्री शाहू महाराज सर्व महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव मंगळवार दि .25 एप्रिल 2023 रोजी जांबूत या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा झाला या जयंती महोत्सवात विविध प्रकारचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9.30 वाजता ध्वजारोहन व दीपप्रज्वलन व प्रतिमांचे पूजन करण्यात आले व सायंकाळी 6:30 वाजता जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली पारंपारिक वाद्ये , साउंड सिस्टीम, विद्युत रोषणाईमध्ये मिरवणूक काढण्यात आली[ads id="ads1"] .
या जयंती महोत्सवाला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते जांबुत गावचे सरपंच दत्तात्रय जोरी , माजी सरपंच बाळूशेठ फिरोदिया, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे , ग्रामपंचायत सदस्य पोपटशेठ फिरोदिया, ग्रामपंचायत सदस्य सुभाष जगताप, जांबुत सोसायटीचे माजी संचालक कचरशेठ गायकवाड , माजी तंटामुक्ती अध्यक्ष सीताराम महस्के ,व काठापूरचे माजी सरपंच बिपिन थिटे , विशाल रणदिवे , प्रमोद जाधव या मान्यवरांनी भेटी दिल्या .महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला अनेक गोष्टी दिल्या.राष्ट्राला एकसंघ बांधणारे संविधान तयार केले.[ads id="ads2"]
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील शोषीत आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,असा संदेश त्यांनी जनतेला दिला भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जात.कामगार संरक्षण कायदा निर्माण केलाकामगारांना प्राथमिक सेवा मिळवून दिल्या.जात,वंश,रंग यांच्यातील फरक विसरून सामाजिक बंधुत्वाला सर्वाच्च स्थान दिले