शुभम वाकचौरे (पुणे जिल्हा प्रतिनिधी)
जांबुत : (ता : शिरूर ) पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असतात पण यश फार कमी तरुणांना मिळत या भरतीसाठी महाराष्ट्रातील लाखो तरुण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असतात या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र पोलीस दलात काम करण्याची त्यांची इच्छा असते.[ads id="ads1"]
अनेकांना पोलिसांचा रुबाब आवडतो पोलिसांची जबाबदारी आणि वर्दी बद्दल तरुणांच्या मनात एक वेगळाच आदर असतो त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज दाखल करतात यापैकी अनेकांचे पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होतं तर काही तरुण पुन्हा जोमाने पोलीस भरतीच्या तयारीला लागतात पोलीस होणे अशक्य नाही हे कृष्णा सावंत ने दाखवून दिले आहे लहानपणातच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पोरका झालेला कृष्णा धनसिंग सावंत चा सांभाळ त्याच्या आत्या ने केला त्याचा जन्म चासकमान येथे झाला त्यानंतर त्याचे बालपण जांबुत ठिकाणी गेले.[ads id="ads2"]
त्याचे बारावी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण जांबुत या ठिकाणीच झाले कृष्णाचे आई वडील दुसऱ्याच्या बांधावर काम करून मोलमजुरी मिळवायचे सकाळी काम केलं की संध्याकाळी पोटाची सोय व्हायची असं त्यांच हातावरचं पोट असलेली काहीशी परिस्थिती त्याच्या कुटुंबाची होती कृष्णाच्या लहानपणीच त्याच्या वडिलांचे छोट्याशा आजाराने निधन झाले. तर नंतर एक दोन वर्षाच्या कालावधीत त्याच्या आईचे अपघाती निधन झाल्याने कृष्णा आणि त्याचा मोठा भाऊ दत्ता दोघे पोरके झाले .पोरके झाल्यानंतर त्याची आत्या संगीता मकवणे ने दोघा ही भावांना आई वडिलांची कमी भासू दिली नाही त्या दोघाही भावांना आई वडिलांप्रमाणे जीव लावला व त्यांचा सांभाळ केला कृष्णा सावंत ज्या गरीब परिस्थितीत संघर्ष करत पुढे आला . कृष्णाचा हा प्रवास फार खडतर होता पण त्याच्या जिद्दीने तो पुणे शहर पोलीस झाला. कृष्णाला पोलीस खात्यामध्ये अधिकारी बनायचं त्याचा स्वप्न आहे तो त्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहील जांबुत : (ता :शिरूर ) जिनियस करिअर अकॅडमी च्या माध्यमातून व आईवडिलांच्या आशीर्वादाने त्याचे स्वप्न त्याने अखेर पूर्णत्वाला नेले .या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने व सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले.