भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फुटाच्या पुतळ्याचे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते हैदराबादमध्ये अनावरण होणार

 
LIVE : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फुटाच्या पुतळ्याचे ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते हैदराबादमध्ये अनावरण होणार

 मुंबई  ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फुटांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण १४ एप्रिल २०२३ रोजी तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथे होणार आहे.[ads id="ads1"]  

या भव्य पुतळ्याचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. तेलंगणा यावेळी राज्याचे मुख्यमंत्री के.सी. राव हेदेखील उपस्थित राहणार आहेत.[ads id="ads2"]  

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.सी. राव यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा भव्य पुतळा देशातील सर्व जनतेला प्रेरणा देणारा असेल अशी प्रतिक्रिया तेलंगणा मुख्यमंत्री के.सी.राव यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील सर्वात मोठे भव्य स्मारक हे ठरेल. याची उंची १२५ फूट असून याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. ११.४ एकरात दीडशे कोटी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात आले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️