कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावे -आमदार सत्यजित तांबे


जळगाव (हमिद तडवी) शिक्षण उपसंचालक संचालक कार्यालय नाशिक येथे शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण व सहाय्यक शिक्षण उपसंचालक यांनी एल डी सोनवणे कार्यालयीन अधीक्षक श्री देवरे यांच्या उपस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रलंबित असणाऱ्या समस्यांविषयी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत विविध शैक्षणिक विषयावर चर्चा केली.[ads id="ads1"]  

  यावेळी जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून अदा केले जावे या प्रमुख मागणीवर चर्चा केली यासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या प्रश्नाचे लवकरच निराकरण करू हे आश्वासन दिले. प्रलंबित शालार्थ मान्यता, तासिका व अर्धवेळ तत्त्वावरील मान्यता, पायाभूत पदे टप्पा अनुदानावरील शिक्षकांचे शालार्थ क्रमांक, संचमान्यतेच्या नियमानुसार आधार कार्ड विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळी काही ठिकाणी आधार मिस मॅच होत आहे असे विद्यार्थी संचमान्यतेतून वगळू नये संच मान्यतेच्या वेळी ते विद्यार्थी ग्राह्य धरून संच मान्यता मंजूर करण्यात याव्यात. सातव्या वेतन आयोग दुसरा हप्ता साठी शासनाने वाढीव अनुदान तात्काळ मंजूर करावे .माध्यमिक शिक्षकांचे टप्पा अनुदानावरील शालार्थ तात्काळ अदा करावे. नियमित वेतन श्रेणीमधील प्रलंबित मान्यता त्वरित देण्यात याव्यात.[ads id="ads2"]  

  या मीटिंगच्या दरम्यान नवनियुक्त सहाय्यक उपशिक्षण उपसंचालक श्री एल डी सोनवणे यांचा संघटनेच्या वतीने महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे, नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा बी ए पाटील जळगाव जुक्टो कार्याध्यक्ष शैलेश राणे, सुनील पाटील स्वप्निल पवार वंचित बहुजन आघाडीचे शुद्ध धन सोनवणे मुख्याध्यापक संघटनेचे डी पी साळुंखे शिक्षकेतर  कर्मचारी संघटनेचे श्री डोलारे उपस्थित होते शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात जुक्टो संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा सुनील गरुड यांनी मीटिंग पूर्वी आमदार सत्यजित तांबे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली राष्ट्रीयकृत बँकेतून पगार व्हावे याविषयी जळगाव ज्युक्टो जिल्हाध्यक्ष प्रा नंदन वलींकार ,सचिव प्रा सुनील सोनार यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️