रावेर शहरात वीज चोरी केल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल

 


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  : रावेर (Raver) येथील विद्युत वितरण कंपनीच्या वतीने रावेर (Raver)शहरात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. रावेर शहरातील शंकर नगर(Shankar Nagar,Raver)  भागात तपासणी करतांना तीन जण वीज चोरी करतांना आढळल्याने त्यांना दंडाची नोटीस देवूनही दंड भरण्यात न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]  

तिघांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल

 रावेर येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांच्यासह वीज तंत्रज्ञ अमोल हिवरे, भिका साळुंखे, वासुदेव चौधरी, कमलेश माळी या पथकाने रावेर शहरातील शंकर नगर भागात वीज चोरांविरुद्ध धडक मोहिम राबवली. यामध्ये शेख परवेज शेख लुकमान या वीज धारकाच्या मीटरमध्ये शेख लुकमान शेख रहेमान यांनी फेरफार केल्याचे आढळून आल्याने त्यांना 11 हजार 573 रुपये दंड करण्यात आला.[ads id="ads2"]  

   तसेच सय्यद जब्बार सय्यद हुसेन यांच्या मीटरमध्ये देखील फेरफार आढळल्याने त्यांना नऊ हजार 627 रुपये दंड करण्यात आला आणि शेख शाहरुख शेख फारूक यांच्या नावे असलेल्या मीटरमध्ये शेख फारूक शेख कासम यांनी फेरफार केलेली दिसून आल्याने त्यांना सात हजार 97 रूपये दंड करण्यात आला. वेळेत दंड अदा केला नाही म्हणून या तिघांविरुद्ध रावेर पोलिसात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️