(महाराष्ट्र विशेष प्रतिनिधि)
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य,मुंबई व जय भवानी कलापथक व सांस्कृतिक मंडळ,जवळा ता संगोला जि सोलापुर यांचे संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र पंढरपुर येथे दिनांक 13 मार्च ते 31 मार्च 2023 या 20 दिवशीय शाहिरी प्रशिक्षण शिबिर समारोपिय व शाहिरी सादरिकरण " व्रत शाहिरी लोककलेच - लेण महाराष्ट्राच"मध्ये बुलडाणा जिल्ह्याचे युवा लोककला प्रशिक्षक यांचा विशेष सन्मान करून गौरव करण्यात आला.[ads id="ads1"]
श्रीक्षेत्र पंढरपुर येथील सदभावना भवन मध्ये आयोजित सदर समारोपिय कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा सालुंखे,सांस्कृतिक कार्य संचालनालय, संचालक विभीषण चवरे,राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त भारुड सम्राज्ञनी चंदाताई तिवाड़ी,बालासाहेब पोल,अ भा शाहिर परिषद सोलापुर जिल्हा अध्यक्ष रमेश खाड़े, गोंधली समाज संघटना अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड़,शिवाजी विद्यापीठ प्रा सयाजीराव गायकवाड़, प्रा परशु पवार लोककलावन्त प्रबोधन परिषद राज्य अध्यक्ष बालासाहेब मालुसकर, कार्याध्यक्ष शाहिर डी आर, इंगले,शाहिर नानाभाऊ परिहार,शिबिर संयोजक आयोजक शाहिर सुभाष गोरे व महाराष्ट्रातील आर ओ बी अंतर्गत नोंदनीकृत कला संच प्रमुख शाहिर ग्रुप लीडर इत्यादि मान्यवरानी विचारपीठा वरील स्थापित महामानवांच्या प्रतिमा सामोर दीप प्रज्वलित करून पूजन केले.[ads id="ads2"]
शिबिर संयोजक सुभाष गोरे यांनी प्रास्ताविक केले.
सदर 20 दिवशीय शाहिरी प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून लोककला प्रशिक्षक प्रा. गजेंद्र गवई यांनी महापुरुषाचे जीवन चरित्राची शाहिरी,लोककलेमधून मांडणी या विषयावर प्रशिक्षण दिल्याबद्दल लोककला प्रशिक्षक म्हणून आयोजकाच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लोककला प्रशिक्षक म्हणून शाहिरी फेटा, सन्मानपत्र शाल पुष्पहार घालुन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी लोककला
संवर्धन व सादरिकरण साठी उपस्थित मान्यवरानी आपापले विचार प्रकट केले.
याप्रसंगी 20 दिवस शाहिरी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांनी विविध लोककला चा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम," व्रत शाहिरी लोककलेच -लेन महाराष्ट्राच " प्रभाविपने सादर केला.
शिबिर व समारोपिय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाहिर प्रतापसिंह गोरे, विक्रम गोरे, विशाल मघाड़े, भैय्या पांडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शाहिर उत्तम गायकर यांनी केले तर आभार शाहिर बालासाहेब मालुसकर यांनी मानले .