या समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारमधील जवळपास सर्व महत्त्वाचे नेते, मंत्री उपस्थित राहतील. या समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. मैदानाच्या 400 एकर परिसरात आतापर्यंतचा सर्वांत मोठा 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. Appasaheb Dharmadhikari आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सुमारे 20 लाख सदस्य अनुयायी आणि सर्वसामान्य लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.[ads id="ads2"]
या समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारमधील जवळपास सर्व महत्त्वाचे नेते, मंत्री उपस्थित राहतील. या समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. मैदानाच्या 400 एकर परिसरात आतापर्यंतचा सर्वांत मोठा 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. Appasaheb Dharmadhikari आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सुमारे 20 लाख सदस्य अनुयायी आणि सर्वसामान्य लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या सोहळ्याच्या मुख्य व्यासपीठाची निर्मिती देखील एखाद्या किल्ल्याप्रमाणे करण्यात येत आहे. या मुख्य व्यासपीठावर सर्वांना बसायची अनुमती नसल्याने दोन्ही बाजूला व्हीआयपी आमंत्रितांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यासपीठासमोर अनुयायांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पासेसवर क्यूआर कोड देण्यात आले आहेत.
Appasaheb Dharmadhikari आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा आढावा
- श्रीमत दासबोधाच्या निरुपणातून समाज घडवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.- त्यांच्या वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची दखल संपूर्ण जगातून घेण्यात आली आहे.- अंधश्रद्धेवर प्रहार, व्यसनमुक्ती, लोकशिक्षण यावर त्यांनी कायम भर दिला.- स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाव, वाड्या, शहर स्वच्छ करण्याचा दैनंदिन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.- त्यांचे समाजाप्रती असलेले काम पाहून भारत सरकारने याआधी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे.