धडकेनंतर वाहन चालक पसार
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेती व हातमजुरी मजूरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असलेल्या पाटील यांच्या निधनानंतर कुटूंबावर मोठे संकट कोसळले आहे. पाटील हे अज्ञात वाहनाच्या धडकेने गंभीर जखमी झाले होते. अशोका कंपनीच्या रुग्णवाहिकेतून (Ashoka Company Ambulance) त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) दाखल करण्यात आले मात्र 28 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू ओढवला.[ads id="ads2"]
गतीरोधकाची मागणी
महामार्ग क्रमांक 753 जे चे काम झाल्यापासून रस्त्यावर भरधाव वेगाने वाहतूक सुरू असल्याने नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. अनेक वेळा गतीरोधक ची मागणी करण्यात आली आहे. गतीरोधकाच्या मागणीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. या अपघातानंतर तरी नांद्रा गावातील हद्दीत माध्यमिक विद्यालयापासून ते गावाच्या बाहेर पर्यंत गतीरोधक करण्याची मागणी होत आहे.