धक्कादायक : एकाच दिवशी झाले दोन खून ; जळगाव जिल्हा हादरला


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  एकाच दिवसात अमळनेर तालुक्यात (Amalner Taluka)  झालेल्या २ खुनांमुळे तालुका हादरला आहे. एकाच दिवसात अमळनेर तालुक्यात(Amalner Taluka)  २ वेगवेगळ्या ठिकणी खून झाले आहेत.घडलेल्या हा घटनांमुळे फक्त अमळनेरचं नाही तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. [ads id="ads1"] 

खुनाची पहिली घटना म्हणजे अमळनेर शहरात (Amalner City) स्पिकरच्या आवाज कमी करण्यावरून झालेल्या वादातून चाकूने भोसकून तरूणाचा खून करण्यात आला.यावेळी पहिल्या घटनेत अमळनेर शहरातील (Amalner City) दाजीबानगरात कार्यक्रमात सुरू असलेला लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून अक्षय राजू भील (वय-२१) या तरूणावर सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्री पाच ते सहा जणांनी चाकू भोसकून गंभीर जखमी केले होते. त्याला धुळे येथील शासकीय रूग्णालयात (Dhule Civil Hospital) उपाचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली.[ads id="ads2"] 

तर खुनाची दुसरी घटना म्हणजे अमळनेर तालुक्यातील सावखेडा (Savkheda Taluka Amalner) गावात दारूच्या नशेत असतांना झालेल्या वादात तरूणावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २४ एप्रिल रेाजी रात्री घडली. २४ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास नाना मंगलसिंग बारेला (वय-२१) या तरूणाला वयक्तिक वादातून संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला (वय-२२) याने कुऱ्हाडीने वार करून नाना बारेला याचा खून केला. 

हेही वाचा :- वादळाच्या तडाख्याने विजतारा पडल्याने दोन बैल दगावले व शेतकरी गंभीर जखमी ; रावेर तालुक्यातील घटना

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी 

हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर :  जनधन बँक खाते  असेल तर मिळणार "इतके" रुपये

हेही वाचा:- 60 वर्षीय वृद्धास लक्झरीने चिरडले ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे (Amalner Police Station) पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोहेकॉ सुनील जाधव, पोकॉ राहुल पाटील यांनी सावखेडा गावातील खून प्रकरणात संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला याला ताब्यात घेतले आहे

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️