रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी

रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी

ऐनपुर प्रतिनिधी:-  विजय एस अवसरमल

  रावेर तालुक्यातील  ऐनपूर(Ainpur Taluka Raver) येथील वर्षानुवर्षे चालत आलेली बारागाड्या ओढण्याची परंपरा कोरोना काळ वगळता यंदाही कायम ठेऊन ऐनपूर येथील बारीघाट येथे बारागाड्या ओढण्यात आल्या परंतु यात बारगाड्याचा ताबा सुटल्याने एक जणाचा मृत्यू तर चार ते पाच जण जखमी झाले.[ads id="ads1"] 

  सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील ऐनपूर (Ainpur Taluka Raver) येथे मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा ही जुनी असून वर्षानुवर्षं येथे बारागाड्या हे ओढण्यात येत असतात,परंतु संपूर्ण देशात कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने कोरोना काळ वगळता ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली होती.अक्षय तृतीयेच्या  दुसऱ्या दिवशी या बारागाड्या ओढण्यात येतात,अक्षयतृतीया निमित्त दि.२३ एप्रिल रोजी ऐनपुर (Ainpur Taluka Raver) येथील बारिघाट येथे या बारागाड्या ओढण्यात आल्या. परंतु त्या ओढत असताना गाड्यांचा ताबा सुटल्याने प्रेक्षकांमधून दिनकर रामकृष्ण कोळी,सह भगतीन मंगलाबाई प्रकाश भिल,सुभाष भील,ईश्वर भील,नामदेव भील,किशोर हरी पाटील ,मोहन एकनाथ महाजन, तर बगल्यांमधे सुनील राजाराम महाजन तसेच ज्यु ओढणारे नारायण शामराव महाजन, ईश्वर रूपा भिल्ल, हे जखमी झाले.पोलीस प्रशासन व गावकरी मंडळी यांनी जखमींना तात्काळ तेथून हलवून रुग्णालयात दाखल केले.[ads id="ads2"] 

यात दिनकर रामकृष्ण कोळी वय ६० वर्ष यांना जास्त मार लागल्याने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालय (Raver Rural Hospital)येथे घेऊन गेले असता त्यांना मयत घोषित केले. तर बाकी  जखमीवर उपचार सुरू आहे.

हेही वाचा :- वादळाच्या तडाख्याने विजतारा पडल्याने दोन बैल दगावले व शेतकरी गंभीर जखमी ; रावेर तालुक्यातील घटना

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बारा गाड्यांखाली येऊन एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी 

हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर :  जनधन बँक खाते  असेल तर मिळणार "इतके" रुपये

हेही वाचा:- 60 वर्षीय वृद्धास लक्झरीने चिरडले ; जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना

त्यावेळी भगत म्हणून सोपान भील तर बगले म्हणून सुनील महाजन आणि सचिन महाजन हे सहायक होते.निंभोरा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक (Nimbhora Police Station API)  गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ज्ञानेश्वर चौधरी, नितीन पाटील, योगेश चौधरी व होमगार्ड यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता.

आ.चंद्रकांत पाटील यांची घटनास्थळी भेट

आज मतदार संघातील ऐनपूर ता.रावेर येथे बारा गाड्या ओढण्याचा धार्मिक कार्यक्रम सुरू असतांना दुर्दैवी घटना घडून काही नागरिक जखमी झाल्याची माहिती पडताच ,ऐनपूर येथे जाऊन जखमींची विचारपूस करून काहींना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय,रावेर येथे रवाना केले.

Posted by Chandrakant N Patil on Sunday, April 23, 2023

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️