उल्टा चोर कोतवाल को दाटे...खंडणीची धमकी देणारा ताब्यातील गाळा खाली करून देणार ..?


यावल (सुरेश पाटील) यावल नगरपालिका मालकीचे एपीजे अब्दुल कलाम व्यापारी संकुलनातील 4 गाळ्याची(दुकानांची)मुदत संपल्याने सदर गाळ्याचां लिलाव करणे कामी आणि संदर्भीय ठरावानुसार, प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याने नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत सदरचे गाळे खाली करून नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात यावे असे लेखी कळविलेले असताना सुद्धा संबंधित एक गाळा धारक याबाबत मात्र संबंधितांना आणि प्रसिद्धी माध्यमांना वस्तुस्थिती मांडणाऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने 'उलटा चोर कोतवाल डाटे' असे संपूर्ण व्यापारी वर्तुळात आणि त्या व्यापारी संकुलनात बोलले जात आहे.[ads id="ads1"]  

        यावल नगरपरिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी दि.29/12/2022 रोजी यावल नगरपालिका मालकीचे एपीजे अब्दुल कलाम व्यापारी संकुलनातील गाळा क्र.5/अ,गाळा क्र. 19/अ,गाळा क्र.38/अ, गाळा क्र.62/अ या गाळाधारकांना दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे की,[ads id="ads2"]  

वरील प्रमाणे आपल्या नावासमोर दर्शविलेला गाळा यावल नगरपरिषद सभा ठराव क्र.524 दि.23/3/ 2015 रोजी जाहीर लिलावात भाग घेऊन बोली बोलून तीन वर्ष कालावधीसाठी भाड़े तत्त्वावर घेतलेला आहे.सदर गाळ्याचा लिलाव काढण्याकामी संदर्भीय ठराव क्र.141नुसार प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे तरी आपण सदर नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत सदर गाळा खाली करून नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात यावा अन्यथा आपल्या विरुद्ध पुढील कारवाई करण्यात येईल असे कळविले असले तरी गेल्या तीन महिन्यात संबंधित गाळाधारकांनी आपल्या ताब्यातील गाळा खाली करून दिला नाही.

हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे

यातील एक दुकानदार गाळाधारक मात्र आपल्यावर कार्यवाही होऊ नये म्हणून तसेच यावल नगरपालिका आणि प्रसिद्धी माध्यमातून आवाज उठविण्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करेल असा सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक रित्या दम भरत असल्याने 'उलटा चोर कोतवाल को डाटे' असे यावल शहरात बोलले जात असली तरी यावल नगरपालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग आणि यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी सदरचे गाळे खाली करण्याबाबत पोलीस बंदोबस्तात कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️