जिल्हाधिकारी प्रशासन, आणि मुख्याधिकारी यांचे संगनमत...?

 


ओला- सुका कचरा म्हणजे काय रे भाऊ हे यावल नगर परिषदेला,ठेकेदाराला माहीत नसताना सोयीनुसार बिल अदा केले जाते.

"आंधळ" दळतंय आणि "कुत्र" पीठ खात आहे.

यावल (सुरेश पाटील)

शासनाच्या नागरी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण 2018 हे अभियान यावल नगरपालिका राबवीत आहे.ओला व सुका कचरा घरातून वेगळा करून घेणे हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे. मात्र,बऱ्याच ठिकाणी लोकांना ओला- सुका कचरा म्हणजे काय याची पुरेशी माहिती यावल नगरपालिकेने दिलेली नाही,आणि यावल नगरपालिका दररोज ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करीत नसल्याने तसेच जनजागृती सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात न झाल्याने.शासनाच्या जागृती मोहिमेतून वारंवार येणाऱ्या शब्दांमुळे ‘ओला- सुका कचरा म्हणजे काय रे भाऊ’ असे भाव नागरिकांच्या चेहऱ्यांवर उमटत आहेत.[ads id="ads1"]  

केंद्र शासनाने 2016मध्ये स्वच्छ भारत अभियान जाहीर केले.संपूर्ण भारत स्वच्छ करण्याच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा तिसरा टप्पा स्वच्छता सर्वेक्षण 2018 या नावाने 1 जानेवारीपासून सुरू करण्यात आला.त्यामध्ये हागणदारीमुक्तीबरोबरच ओला व सुका कचरा नागरिकांकडून वेगळा गोळा करून त्यावर प्रक्रिया करणे, तसेच लोकसहभागातून शहर स्वच्छ राखणे या तीन प्रमुख मुद्‌द्‌यांवर भर दिला गेला. अनुदानातून वैयक्तिक,तसेच सार्वजनिक शौचालये निर्माण करून शहरी भागात हागणदारीमुक्तीकडे पालिकांची वाटचाल सुरू झाली.सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच ओला व सुका कचरा वेगळा करून नागरिकांकडून गोळा करणे हे यावल पालिकेपुढील मोठे आव्हान होते आणि आजही आहे,यावल नगरपालिका ओला व सुका कचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया करीत आहे का..? याची प्रत्यक्ष खात्री कोण करीत आहे..,याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.[ads id="ads2"]  

  ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो म्हणजे घर,हॉटेल, ऑफिसेस,खासगी, आस्थापना आदी ठिकाणी ओला व सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर यावल नगरपरिषदेने भर दिला आहे का? हा प्रश्न आजही उपस्थित होत असून हे करत असताना ओला व सुका कचरा यामध्ये काय,काय मोडते हे स्पष्ट होणे गरजेचे आहे,उष्टे- खरकटे अन्न म्हणजेच ओला कचरा हे अर्धसत्य आहे.जो कचरा कुजून नष्ट होऊ शकतो त्याला ओला कचरा म्हटले जाते.याशिवाय उर्वरित सर्व प्रकारचा कचरा हा सुका कचरा,कचरा ओळखण्याची व त्याचे वर्गीकरण करण्याची ही इतकी साधी सोपी पद्धत आहे.घरात निर्माण होणाऱ्या आपल्या रोजच्या कचऱ्यामध्ये तीन ते पाच टक्के ओला कचरा असतो. यावल शहरात आजही मोकळ्या जागांवर बराच ओला कचरा उघड्यावर फेकला जातो.हॉटेल, रेस्टॉरंट,खानावळी, सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक वेळेला उष्टे- खरकटे अन्न यावल शहरातील मोकळ्या जागांवर  फेकले जात आहे.उघड्यावर, गटारीत फेकल्या जाणाऱ्या उष्ट्या- खरकट्याची मोजदादच नाही.ओल्या कचऱ्यातील घटक उघड्यावर फेकले गेल्याने माशा,डास,हवेचे प्रदूषण, जलप्रदूषण,रोगराई आदी गोष्टींना आपण निमंत्रण देत असतो.तसेच मोकाट डुकरे,कुत्रे यांचा त्रास वेगळा, स्वच्छता सर्वेक्षण 2018 मध्ये हे रोखण्याचे मोठे आव्हान यावल नगरपालिकेपुढे होते ते आव्हान आजही अपूर्ण असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.यात मात्र ओला व सुका कचरा संकलन करून वाहतूक केल्यानंतर त्यावर जी प्रक्रिया फक्त कागदोपत्री केली जात आहे, ओला- सुका घनकचरा प्रकरणात ठेकेदाराला दर महिन्याला नियमित बिल अदा करण्यात येत असल्याने याकडे जिल्हा प्रशासन,मुख्याधिकारी यांच्या संगनमताने सोयीनुसार ओला व सुका कचरा प्रकरणात मोठा घोळ, गैरप्रकार,भ्रष्टाचार होत असल्याने यावल शहरातील सुज्ञ नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

       यावल शहरात ओला व सुका घनकचरा संकलन करताना कचरा वाहतूक वाहनांवर स्पीकर नसल्याने कचरा वाहतूक गाडी केव्हा येते, आणि केव्हा निघून जाते,हे कोणालाही समजत नाही कचरा वाहतूक गाड्या अनियमित कचरा संकलन करीत असल्याने यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे किंवा नाही कचरा वाहतूक गाडीवर स्पीकर साठी जाहीर आव्हान करताना पेन ड्राईव्ह आणि इतर साहित्य नसल्याने नागरिकांना काही समजत नाही याकडे यावल नगरपालिका प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️