ग्रामपंचायतीच्या विहिरीचे‎ खोदकाम करणाऱ्या प्राैढ मजुराचा विहिरीत उतरताना हात‎ निसटल्याने विहिरीत पडून मृत्यू


यावल तालुक्यातील अट्रावल ग्रामपंचायतीच्या  (Atrawal Grampanchayat) विहिरीचे‎ खोदकाम करणाऱ्या प्राैढ मजुराचा विहिरीत उतरताना हात‎ निसटल्याने विहिरीत पडून जागीच ठार झाला. वरून‎ काेसळल्याने त्यास जबर दुखापत झाली हाेती. भीमा‎ अंकात कोळी (वय ५०) असे या मजुराचे नाव आहे. या‎ दुर्दैवी घटनेवेळी विहिरीत एक तरुण काम करत होता. मात्र‎ हात निसटल्यावर काेळी काउंटरवर आदळून अडकले.‎ जर ते त्या तरुणाच्या अंगावर पडले असते तर अनर्थ‎  ओढवला असता.‎[ads id="ads1"]  

यावल तालुक्यातील अट्रावल (Atrawal Taluka Yawal Dist Jalgaon)  येथील मुंजोबा मंदिराजवळील ग्रा.पं. विहिरीचे‎ खोदकाम सुरू आहे. खोदकामासाठी विहिरीत लखन‎ दिनकर कोळी (वय ३२) हा तरुण उतरला होता. नंतर‎ रात्री विहिरीत खोदकामासाठी भीमा अंकात कोळी हे‎ उतरत होते. परंतु अचानक त्यांचा हात निसटल्याने ते‎ विहिरीत कोसळले. विहिरीला लावलेल्या काउंटरवर ते‎ आदळल्याने त्यांना जबर दुखापत झाली. ते काउंटरवर‎ अडकून पडले. तेथेच त्यांचा मृत्यू ओढवला.[ads id="ads2"]  

या घटनेनंतर‎ त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात (Yawal Rural Hospital)  नेण्यात आले. येथील‎ पोलिस ठाण्यात लखन कोळी यांच्या खबरीवरून‎ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस‎ नाईक किशोर परदेशी करत आहे. मृत भीमा कोळी यांच्या‎ पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा‎ परिवार आहे. या घटनेने संपुर्ण गावात हळहळ व्यक्त हाेत आहे.‎

>>>हेही वाचा :-रावेर तालुक्यातील हायप्रोफाईल जुगार अड्यावर एलसीबीची धाड ; 17 संशयित ताब्यात : लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त

>> हेही वाचा : सावद्यात ट्रॅक्टरने धडक दिल्याने १३ वर्षीय मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू

>>>हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️