त्या उखडून पडलेले रस्ते व अस्वच्छता बाबत सावदा पालिकेचे मुख्याधिकारी यांनी घेतली दखल


सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

 रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून मदिना नगर,ताजुश शरिया नगर येथील काही भागात पाण्याची पाइपलाइन पुरवण्यासाठी खडीकरण झालेल्या रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले.मात्र यामुळे सदरील रस्त्यांचे खडीकरण उखडून पाडल्याने तसेच रस्त्याच्या मधोमध नियोजन शुन्य व निकृष्ट वाल कूंड उभारण्यात आल्यामुळे पायी सह दुचाकीवरून ये-जा करणाऱ्या वृध्द महिला व पुरुष सह शाळकरी मुलांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून,[ads id="ads1"]   सदरील परिसरात प्रशासनाच्या वतीने लाईटची सुविधा नसल्यामुळे याभागात रात्री अंधारमय वातावरण असतो,तरी यामुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.तसेच यासोबत सदरच्या परिसरात वेळेवर घाणकचऱ्याची उचल होत नसून,गटारीत देखील कचऱ्यासह दुर्गंधी युक्त पाणी साचत असते,यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.तरी हा संपूर्ण गंभीर प्रकार थेट सावदा पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्भवलेला असून याचे लवकरच निवारण व्हावे.व मदिना नगर,ताजुश शरिया नगर येथील रहिवासी नागरिकांना होणारा सदरील त्रास दुर व्हावा.म्हणून येथील काही लोकांच्या सांगण्यावरून व समक्ष घटणास्थळाची पाहाणी केल्यानंतर समाजसेवक सोहेल खान सैदुल्ला खान यांनी सदरील समस्या निवेदनाद्वारे सावदा पालिका प्रशासनाकडे मांडली होती.[ads id="ads2"]  

  या अनुषंगाने "सावदा न.पा. हद्दीत उखडून पडलेले रस्ते व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल" या मथळ्याखाली सुवर्ण दिप माध्यमातून बातमी प्रसिद्ध होतच पालिका आरोग्य विभाग व बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांना २ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले.तरी देखील सदरील समस्या तात्काळ दुर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️