पहूर जामनेर रोडवरील सोनाळया फाटा जवळील खुनाचे गुन्ह्यातील मारेकन्यास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी अवघे २४ तासात घेतले ताब्यात


जामनेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दिनांक २१/०३/२०२३ रोजी पहूर ते जामनेर रोडवरील सोनाळा फाट्याजवळील शेतात पुरुष जातीचे शव मृत अवस्थेत आढळून आल्याने त्यावरून पहुर पो.स्टे. CCTNS NO ८१ / २०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील मयताची ओळख पटवून त्यातील आरोपी निष्पन्न करून लवकरात लवकर अटक करण्याचे मा. एम. राज कुमार  पोलीस अधीक्षक सो. जळगाव, यांनी आदेश दिले होते.[ads id="ads1"]  

त्यावरून मा. एम. राज कुमार पोलीस अधीक्षक सो. जळगाव, मा. श्री चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा. श्री. अभयसिंग देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक, चाळीसगाव भाग व मा. श्री किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक श्री गणेश वाघमारे, सफी युनुस शेख, पोह महेश महाजन, लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, किशोर राठोड, रणजीत जाधव, सचिन महाजन, ईश्वर पाटील, लोकेश माळी, चालक सफो रमेश जाधव सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळी जावून घटनास्थळाची पाहणी केले असता, घटनास्थळी लोकांकडून तिथे मयताची ओळख पटवली, मयत प्रमोद उर्फ बाळु भगवान वाघ, रा. शिंगाईत ता. जामनेर येथील राहणार असल्याने सदर गावातून गोपनीय माहितीद्वारे तसेच मयताचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून मयत प्रमोद वाघ याचे सोबत त्याचे शिंगाईत ता. जामनेर गावातील त्याचा मित्र बाळू हडप यास ताब्यात घेवून त्यास  पोलीस पथकाची ओळख देवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रविंद्र उर्फ बाळू भगवान हडप, वय ४१, रा. शिंगाईत ता. जामनेर असे सांगीतले. त्यावेळी त्यास आम्ही विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्याने सांगीतले की, दिनांक २१/ ०३ / २०२३ रोजी मी व मयत प्रमोद उर्फ बाळु भगवान वाघ असे आम्ही दोघ सोबत होतो. [ads id="ads2"]  

 दुपारी साधारण ४.०० ते ४.३० चे दरम्यान मयत प्रमोद उर्फ बाळु भगवान वाघ याचेत व माझ्यात पैसे देवाण घेवाण वरून वाद सुरु असतांना मयता हा मला काटीने कमरेवर जोन्यात मारु लागला त्यावेळी माझा संताप अनावर झाल्याने मी जवळ असलेला दगड उचलुन त्याचे डोक्यात दोन वेळेस मारला त्यावेळी त्याचे डोक्यातून व कानातून रक्त येवून तो खाली जमीनीवर पडला त्यावेळी मी त्यास चाचपडून पाहिले असता तो काहीएक हालचाल करीत नसून तो मयत झाल्याने मी घाबरून त्याचे पाय ओढून त्याचे प्रेत जवळ असलेल्या ज्वारीच्या शेतात पिकाचे आडोश्याला सोडून दिले. त्याची मोटार सायकल व मोबाईल घेवून तेथून निघुन गेलो होतो अशी कबुली दिल्याने पुढील तपासाकरीता पहुर पो.स्टे. CCTNS NO ८१/ २०२३ भादवि कलम ३०२ या गुन्ह्यात तपासी अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️