शेळगाव येथील अंगणवाडी ला निकॄष्ट दर्जा चे धान्य पुरवठा : लहान बालकांच्या आरोग्य धोक्यात



फिरोज तडवी( प्रतिनिधी) 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेळगाव येथील अंगणवाडीत बालकांना जे भोजन देण्यात येते शासनाच्या वतीने महीला बालकल्याण खात्यामार्फत त्याचा पुरवठा त्यांनी ठरवुन दिलेल्या संस्था किंवा ठेकेदार मार्फत अंगणवाडी ला पुरविण्यात येतो.[ads id="ads1"]  

                 शेळगाव येथील अंगणवाडीला पुरविणे आलेल्या धान्य स्वरूपातील वस्तू ची येथील उपसरपंच निळकंठ पाटील, पंकज जिरी यांनी पाहणी केली असता हरबरा,हळद, तांदूळ,लाल मिरची पावडर,भरडा, मुगडाळ, तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे असुन मिरची पावडर भुरकट कलरची असुन निचव लागत आहे हरबर्या मध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचे खडे आढळुन आले.[ads id="ads2"]  

भरड्याला तर भुरसीचे जाळे लागलेलेआढळून आले याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, महिला बालकल्याण अधिकारी यांना निवेदन देण्यात येईल.

          तरी संबंधित पुरवठा करणार्या वर त्वरीत कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️