सावद्यात ट्रॅक्टरने धडक दिल्याने १३ वर्षीय मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू

सावद्यात ट्रॅक्टरने धडक दिल्याने १३ वर्षीय मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू

सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे रविवार पेठ परिसरातील खंडेराव वाडी जवळ दि.४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७-वाजेच्या सुमारात नुर मोहुम्मद शेख वय १३ रा.ख्वाजानगर सावदा यास एका अज्ञात ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली यात तो गंभीर जखमी झाला.तरी फैजपूर येथील आशीर्वाद एक्सीडेंट हॉस्पिटल मध्ये त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे.[ads id="ads1"]  

  याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात डॉ.शैलेश खचणे यांनी खबर दिली असता शून्य क्रमांकाने अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली.असून पुढील अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई आज दि.५ फेब्रुवारी रोजी सावदा पोलीस ठाण्यात केली जात आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा बीटचे पोलीस कर्मचारी करीत आहे.तरी शहर व परिसरात अशा विना क्रमांक असलेले वाहन राजेरोसपणे विविध प्रकारचे मालाची वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात दिसून येते.[ads id="ads2"]  

  अशा वाहनांपैकी सदर प्रकारे क्रमांक नसलेला व हळद भरलेला वाहन अपघात करून सध्या तरी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.मात्र यामुळे पोलिसांना वाहनाचा शोध लावण्यसाठी तारे वरची कसरत करावी लागते.तसेच अपघाती किलेमसाठी अपघात ग्रस्त व्यक्तींच्या नातेवाईकांना मुकावे लागते.सबब पोलीसांसह आर.टी.ओ.विभागा तर्फे जनहिता करिता आशा वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :-रावेर तालुक्यातील हायप्रोफाईल जुगार अड्यावर एलसीबीची धाड ; 17 संशयित ताब्यात : लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त

हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️