सावदा न.पा.हद्दीत उखडून पडलेले रस्ते व अस्वच्छतामुळे नागरिकांचे हाल!

त्या रस्त्याची पाहणी करतांना समाजसेवक सोहेल खान,शेख अनिस,शेख अकील,जब्बार पटवे,गौस भाई

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपरिषदेच्या हद्दीतील गौसिया नगर,मदिना नगर,ताजुश शरिया नगर सह विविध ठिकाणी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून रस्त्यांचे खडीकरण करण्यात आले असता सदर परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांनंतर चांगले रस्ते सह नविन पाण्याची पाइपलाइन व गटारीची सुविधा मिळाली.हे मात्र खरे आहे.[ads id="ads1"]  

परंतु नुकतेच नविन पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी मदिना नगर व ताजुश शरिया नगर येथील काही ठिकाणी खडीकरण करण्यात आलेले रस्त्यांचे पुन्हा खोदकाम करून पाइपलाइन टाकून सदरचे रस्ते उखडलेल्या स्थितीत सोडून दिल्याने,तसेच भररस्त्यात निकृष्ट वाल कूंड उभारण्यात आल्यामुळे या रस्त्यांचे तिन-तेरा झाल्याने येथील वृद्ध महिला व पुरुष सह शाळकरी मुलांना ये-जा करतांना मोठा त्रास सहन करावा लागत असून,या संपूर्ण परिसरातील गटारीत घाणकचरा व दुर्गंधी युक्त पाणी साचलेले दिसून येते.[ads id="ads2"]  

  तसेच वेळेवर घाणकचऱ्याची उचल होत नसून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला,असून या संपूर्ण गंभीर प्रकारास न.पा.प्रशासना तर्फे होत असलेला दुर्लक्ष कारणीभूत आहे.तरी यामुळे नागरिकांना ना हक होत असलेला त्रास तात्काळ दुर व्हावे.अशी मागणी समाजसेवक सोहेल खान सैदुल्ला खान यांनी मुख्याधिकारी न.पा.सावदा यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा:- भुसावळ तालुक्यातील वरणगाव जवळ एसटीच्या धडकेत तीन जण तरुण ठार

हेही वाचा :- एका महिलेची हत्या करुन गोणपाटात मृतदेह टाकून फेकून दिल्याची घटना उघडकीस ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️