धम्म संस्कार आचरणातुन प्रवाहित करण्याची नैतिक जबाबदारी महिला, उपासिकांची - प्रवक्ते गजेंद्र गवई यांचे सावरखेड़ येथील धम्म जागरण रैली प्रासंगिक मनोगत

 


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ( गजेंद्र गवई) 

संस्कारक्षम आई-घरादारा सह समाजास पुढे नेई या उक्ति नुसार धम्माचे संस्कार अंगिकारणारी महिला उपासिका आपल्या आचरणातुन संस्कारक्षम समाज निर्मिति करू शकते त्यासाठी महिलांनी धम्म कार्यात पुढाकार घेऊन धम्म प्रचारित करण्याची नैतिक जबाबदारी घ्यावी असे मत समाजजागृति अभियाना प्रवक्ते गजेंद्र गवई यांनी मौ सावरखेड़ येथे आलेल्या भीखूसंघ व श्रामनेर संघ धम्म रैली निमित्ताने आयोजित धम्म प्रबोधन कार्यक्रमात व्यक्त केले.[ads id="ads1"]  

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया -भारतीय बौद्ध महासभा ,अखिल भारतीय भिक्खु संघ,समता मुकनायक बहुउद्देशिय संस्था,नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने दहा दिवशीय भव्य फिरते धम्म प्रशिक्षण अभियान दी 8 मार्च ते 17 मार्च 2023 गवंढाला ते बारडा मार्गात येणाऱ्या 30 गावात राबविले जात आहे. [ads id="ads2"]  

मौ सावरखेड़ ता चिखली येथे आम्रपाली उपासिका संघा च्या वतीने सदर धम्म रैली च्या स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

सदर कार्यक्रमा अंतर्गत सम्पूर्ण सावरखेड़ गावातून भीखूसंघ व श्रामनेर संघाची फुलाच्या वर्षाव करून मिरवणूक काढण्यात आली..गावातील स्थापित बुद्धमूर्ति समोर भिक्खु संघाच्या मार्गदर्शनात वंदना ,धम्मदेशना कार्यक्रम पार पडला ..

याप्रसंगी भन्ते शीलरत्न, भन्ते महानाम, भन्ते दीपांकर, भन्ते धम्मबोधि यांची विशेष उपस्थिति होती तर अभियान प्रवक्ते विलास सरदार, सरपंच सुभाषअवसरमोल गोमेधर, प्रा गजानन गवई दे माली,राजू बोरकर, गणेश बोरकर यांची उपस्थिति होती.

आम्रपाली उपासिका संघाच्या समस्त महिला उपासिकाना गजेंद्र गवई यांनी याप्रसंगी, महिला संघ नोंदणी प्रक्रिया, विहार निर्मिति, स्वयंरोजगार निर्मिति,याबाबत संबोधित केले.

कार्यक्रमास बहुसंख्येनें उपासक उपासिका सहभागी होते...

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️