रुईखेडा ग्रामपंचायतीने दिला दिव्यांगांना आर्थिक मदतीचा हात


मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दि. ३१/०३/२०२३ रोजी रुईखेडा येथील जवळपास तीस दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या वतीने आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वाटप सरपंच सौ.उषा अजय गुरचळ ,उपसरपंच काळू हबलू वंजारी, ग्रा प सदस्य अतुल बढे, दिनकर पाटील,कुलसुमबी हमीद वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू बंगाळे,श्रीराम सनसे,अजय गुरचळ व इतर ग्रामस्थ हजर होते.[ads id="ads1"]  

या वेळी ग्राम विकास अधिकारी दीपक कोसोदे यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील दिव्यांगासाठी ग्रा प कडून करण्यात आलेल्या तरतुदी नुसार शंभर टक्के खर्च करण्यात आल्याची माहिती दिली.[ads id="ads2"]  

दिव्यांगासाठी आर्थिक मदतीचा हात दिल्याने रुईखेडा ग्रा प ही तालुक्यातील दिव्यांगासाठी १००% खर्च करणारी ग्रामपंचायत ठरल्याने त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे, इतर ग्रामपंचायतीने देखील दिव्यांगासाठी आर्थिक मदतीचा असा हात पुढे करावा,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:- स्कूल बसचा अपघात : ३० विद्यार्थी जखमी : जळगाव जिल्ह्यातील घटना

हेही वाचा:- रावेर तालुक्यातील "या" गावातील तरुणाची आत्महत्या

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️