रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यात वाळू चोरी विरोधी पथकांनी नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहे. [ads id="ads1"]
परंतु उक्त वाहनांचे मालक यांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम वसुल करणेकामी दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय रावेर येथे जप्त केलेल्या १० वाहनांचे लिलाव करण्यात येणार होता. परंतू प्रशासकीय कारणास्तव लिलाव होवू शकला नाही त्यामुळे आता सदरचा लिलाव दि. ९ मार्च रोजी ११ वाजता होणार आहे. [ads id="ads2"]
लिलावात ९ ट्रॅक्टर व १ जेसीबी यांचा समावेश आहे. तरी जास्तीत जास्त ईच्छुक व्यक्ती, संस्थांनी लिलावात भाग घ्यावा. लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेली वाहने, लिलावात हातची किंमत, इत्यादी बाबतची माहिती कार्यालयीन वेळेत तहसील रावेर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.
>>>हेही वाचा :-रावेर तालुक्यातील हायप्रोफाईल जुगार अड्यावर एलसीबीची धाड ; 17 संशयित ताब्यात : लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त
>> हेही वाचा : सावद्यात ट्रॅक्टरने धडक दिल्याने १३ वर्षीय मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू
>>>हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार
>>>हेही वाचा :- ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोदकाम करणाऱ्या प्राैढ मजुराचा विहिरीत उतरताना हात निसटल्याने विहिरीत पडून मृत्यू