निंभोरे सिम येथील राजू सवर्णे यांची सरपंच परिषदेच्या राज्य समन्वयक(अनु.जाती विभाग) पदी निवड

 निंभोरे सिम येथील राजू सवर्णे यांची सरपंच परिषदेच्या राज्य समन्वयक पदी निवड

जळगांव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - दि.२९ मार्च रोजी अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांचे तर्फे येथिल जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन मध्ये जिल्हा परिषद कर्मचारी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.[ads id="ads1"]  

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.जयंत सर्जेराव पाटील हे होते. या कार्यक्रमाप्रसंगी निंभोरासीम ता. रावेर जि. जळगांव येथिल माजी सरपंच राजूभाऊ सवर्णे यांची महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या राज्य समन्वयक (अनु.जाती विभाग) पदावर निवड करण्यात आली.[ads id="ads2"]  

   निवडीचे पत्र मा. जयंत सर्जेराव पाटील यांचे हस्ते  मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष वासू नरवाडे, प्रदेश सचिव विवेक ठाकरे, तालुकाध्यक्ष प्रमोद चौधरी,अतुल पाटील, विजय महाजन यांचे सह जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.निवडीबद्दल राजूभाऊ सवर्णे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️