रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर वनविभागाने (Raver Forest) डिंक तस्करांविरोधात धडक मोहिम राबवली जात असून जवळ जवळ 90 किलो डिंक जप्त केला आहे. सदर कारवाई ही शुक्रवारी दिनांक 3 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास दोन वाहनांवर कारवाई करून सुमारे 53 हजार रुपयांचा 90 किलो डिंक जप्त करण्यात आल्याने डिंक तस्कर धास्तावले आहेत.[ads id="ads1"]
तसेच पिंपरकुड ते निमड्या रस्त्याने अवैध गौण वनउपज (धावडा डिंक) वाहतूक करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्यात आला संशयित वाहन सोडून पसार झाले. दुचाकी (एम. एच. 19 डी. सी. 808) व (एम. एच. 19 यु. 0178) मधून 90 हजार रुपये किंमतीचा डिंक जप्त करण्यात आला.[ads id="ads2"]
तसेच दुसरी कारवाई पहाटे नियतक्षेत्र जिन्सी कक्ष क्रमांक 10 मध्ये करण्यात आली आहे. अवैध गौण वनउपज (सलई डिंक) वाहतूक करताना दुचाकीस्वार मांगीलाल शेरसिंग मेहता (35, रा. धुलकोट, नेपानगर, जि. बऱ्हाणपूर) यास ताब्यात घेण्यात आली. संशयित दुचाकी (एम. पी. 68 एम. ई. 6322) द्वारे 33 हजार 300 रुपये किंमतीचा डिंक वाहतूक करताना आढळून आला.
हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार
सदरची कारवाई ही रावेर वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रवींद्र सोनवणे, अरुणा ढेपले, वनरक्षक रमेश भुतेकर, सुधीर पटणे, सविता वाघ, वाहन चालक विनोद पाटील यांच्या पथकाने केली.