रावेर तालुक्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड ; 17 संशयित ताब्यात : लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त

रावेर तालुक्यातील हायप्रोफाईल जुगार अड्यावर एलसीबीची धाड ; 17 संशयित ताब्यात : लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
रावेर तालुक्यातील मोरगाव (Morgaon Taluka Raver)  गावाजवळील एका शेतामध्ये  सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्डयावर जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव-पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने दिनांक 6 मार्च सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास छापेमारी करीत 17 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. लाखोंच्या रोकडसह 14 वाहनेही जप्त करण्यात आल्याची माहिती असून दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते तर काही संशयित अंधारामुळे पसार होण्यात यशस्वी झाले.[ads id="ads1"]  

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला रावेर तालुक्यात हायप्रोफाईल जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास एलसीबीने स्थानिक पोलिसांना सोबत घेत मोरगाव  (Morgaon Taluka Raver) जवळील एका शेतात धाड टाकली. [ads id="ads2"]  

  यावेळी अचानक पोलिस आल्याचे दिसतात जुगाऱ्यांमध्ये पळापळ सुरू झाली. पोलिसांनी 17 जणांना ताब्यात घेतले तर घटनास्थळावरून सुमारे दीड लाखांची रोकडसह दुचाकी व चारचाकी वाहने मिळून 14 वाहने जप्त केली. विशेष म्हणजे या हायप्रोफाईल जुगार अड्याचा मालक हा एका बड्या राजकीय नेत्याचा समर्थक असल्याची जोरदार चर्चा आहे. या कारवाईमुळे रावेरसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :- RTE Admission 2023 : आरटीई प्रवेशाला सुरुवात ; पहिली ते आठवीपर्यंत मिळणार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ; फॉर्म भरण्यासाठी "हे" कागदपत्रे लागणार

हेही वाचा : सावद्यात ट्रॅक्टरने धडक दिल्याने १३ वर्षीय मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू

एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा पकडण्यात आलेल्यांमधे समावेश असून या कारवाईमुळे चर्चेला उधान आले आहे.  संदिप दिनकरराव देशमुख (रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर – जुगार अड्ड्डा मालक, संजय दर्शन गुप्ता (रा. लालबाग बऱ्हाणपुर म.प्र.), शांताराम जिवराम मंगळकर रा. लालबाग बऱ्हाणपुर म.प्र., समाधान काशिनाथ कोळी रा.सांगवा ता. रावेर, कासम महेबुब तडवी रा. पिंप्री ता. रावेर, जितेंद्र सुभाष पाटील रा. विवरा ता. रावेर, कैलास नारायण भोई रा. भोईवाडा, रावेर, मनोज दत्तु पाटील रा. पिंप्रीनादु ता. मुक्ताईनगर, मनोज अनाराम सोळंखे रा. आलमगंज बऱ्हाणपूर म.प्र., सुधिर गोपालदास तुलसानी रा. इद्रनगर, बऱ्हाणपूर म.प्र, रविंद्र काशिनाथ महाजन रा. वाघोदा ता. रावेर, बापु मका ठेलारी रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर, राजु सुकदेव काळे रा. प्रतापपुरा बु-हाणपूर म.प्र., युवराज चिंधु ठाकरे रा. महालक्ष्मी मंदिरा जवळ रावेर, सोपान एकनाथ महाजन रा. डापोरा अडगाव ता. ब-हाणपूर म.प्र., छोटया (पूर्ण नाव माहित नाही.), प्रल्हाद पुंडलीक पाटील रा. मोरगाव ता. रावेर (जागा मालक) व इतर दोन ते तीन इसम असे लोक 52 पत्त्याच्या कॅटवर झन्ना मन्ना मांग पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवतांना मिळून आले आहेत. 

  पत्ता जुगाराची साधने, रोख रुपये 1 लाख 46 हजार 940 रुपये, 8 चार चाकी वाहने, 6 मोटार सायकलसह एकूण 55 लाख 46 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रावेर पो.स्टे.ला गु.र.न. 75/23  महा. जुगार प्रति. का. क. 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार अड्डा मालक संदिप दिनकरराव देशमुख हा पुर्वी पुर्णाड ता. मुक्ताईनगर येथे जुगार अडडा चालवत होता.

रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत मोरगाव येथील सदगुरु बैठक हॉलच्या बाजुस प्रल्हाद पुंडलीक पाटील रा. मोरगाव हे जागा मालक त्यांच्या घराच्या वॉल कंम्पाऊंडमध्ये स्वतःच्या फायदयासाठी काही लोकांसह झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळत खेळवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले पथक रवाना केले होते.

पो.नि. किसनराव नजन पाटील यांच्या अधिपत्याखाली पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार रवी पंढरीनाथ नरवाडे, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ कमलाकर भालचंद्र बागुल, महेश आत्माराम महाजन, पोना संतोष रामस्वामी मायकल, पोना किरण मोहन धनगर, पोना श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, चापोहेकॉ भारत शांताराम पाटील, चापोना प्रमोद शिवाजी ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. याशिवाय रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या अधिपत्याखाली पोलिस उप निरीक्षक बाळासाहेब नवले, पोकॉ. समाधान कौतिक ठाकुर, पोकॉ. विशाल शिवाजी पाटील, पोकॉ. प्रमोद सुभाष पाटील, सचिन रघुनाथ घुगे आदींनी एलसीबी पथकाला सहकार्य केले. 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️