बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी (प्रा.गजेन्द्र गवई)
विश्वशान्ति बुद्धविहार बहुउद्देश्यीय स्मारक समिति,बुध्दटेकडी दे माळी यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने मेहकर तालुक्यातील मौ दे. माळी येथे समतापर्व 2023 - फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिति स्थापन करण्यात आली.[ads id="ads1"]
भीमनगर वार्ड क्र 05 मधील बुद्धविहारात उपासिका द्वारकाबाई म्हस्के यांचे अध्यक्षतेखाली समस्त समाजबाँधवांची विशेष सभा आयोजित करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी बुद्धवन्दना घेऊन सभा आयोजक विश्वशान्ति बुद्धविहार समिति सचिव गजेंद्र गवई यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी प्रा गजानन गवई, संतोष मोरे,भीमराव गवई,सिद्धार्थ जाधव, सुनील जाधव ,किशोर वानखेड़े यांचे सह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.[ads id="ads2"]
दिनांक 11 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यन्त समतापर्व 2023 फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव आयोजनासाठी उत्सव समिति पुढिल प्रमाणे गठित करण्यात आली. ज्यामध्ये अध्यक्षस्थानी अश्वजित गवई, उपाध्यक्ष विजय जनार्धन गवई,सचिव-श्याम येलकर,सहसचिव सदाशिव गवई,कोषाध्यक्ष-प्रा सिद्धार्थ जाधव तर सदस्य म्हणून गजेंद्र गवई,प्रा गजानन गवई,भीमराव गवई,सुनील जाधव,किशोर वानखेड़े,संतोष मोरे,सुदर्शन गवई, शशिकान्त जाधव,नीलेश गवई,आकाश वानखेड़े,विठल गवई,अमोल गवई,रंजन गवई,संदीप गवई,आशीष गवई,चंद्रमणि गवई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
समतापर्व 2023 अंतर्गत सलग चार ही दिवस विविध कार्यक्रम आयोजन करने ज्यामध्ये शालेय विद्यार्थि साठी विविध स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,गितगायन स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, महामानव पुतल्याचे सौदर्यीकरण व नुतनिकरण,वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजन व भव्य मिरवणूक ,सदृश्य दिखावे इत्यादि कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविन्यात आले.
सदर सभेस उपासिका लीलाबाई गवई, लक्ष्मी गवई,कमल गवई,गंगूबाई सरदार,बेबिताई भटकर,सालूबाई जाधव, रमाबाई गवई,यांचे सह बहु संख्येने उपासिका, तरुण , उपासक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र गवई यांनी केले तर प्रा सिद्धार्थ जाधव सर यांनी आभार मानले.