अधिकाराचा गैरवापर केल्या प्रकरणी भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे निलंबित

  

भुसावळ  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत भुसावळ येथील (Bhusawal Sub Divisional Officer)  प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे निलंबन करण्यात आले असून त्याबाबतची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrushn Vikhe Patil) यांनी मंगळवारी सभागृहात केली. याबाबतची माहिती महसूल वर्तुळात पसरल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]  

अधिकाराचा वापर करीत भ्रष्टाचाराचा आरोप

आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil)  यांनी भुसावळ प्रांताधिकार्‍यांच्या (Bhusawal Sub Divisional Officer)  कार्यद्धत्तीविषयी आक्षेप घेत तक्रारी नोंदवल्या होत्या शिवाय बोदवड (Bodwad Dist Jalgaon)  येथील गौण खनिज प्रकरणाबाबत लक्ष वेधण्यात आले होते. मूळात शेती प्रयोजनासाठी जागा असताना तेथे गौण खनिजाची उत्खननाला परवानगी देण्यात आली तसेच त्यानंतर तेथेच दंडात्मक कारवाई करण्यात आली व नंतर पुन्हा उत्खनन केल्यानंतर दंडाला स्टे देण्यात आल्याचा अजब प्रकार प्रांताधिकार्‍यांनी (Bhusawal Sub Divisional Officer)   आपल्या अधिकारात अधिकार नसताना बेकायदा केला होता.[ads id="ads2"]  

भुसावळ मधील आमदारांची तक्रार

भुसावळातील आमदार संजय सावकारे (MLA Sanjay Savkare)  यांनीदेखील वेल्हाळे (Velhale Taluka Bhusawal Dist Jalgaon येथील आदिवासी जमिनीचे हस्तांतरणाचे अधिकार नसताना प्रांताधिकार्‍यांनी अधिकाराचे उल्लंघण केल्याची तक्रार केली होती या शिवाय भुसावळातील मेझॉनिक लॉज कुळ कायद्यात बसत नसताना हस्तांतरणाची परवानगी प्रांताधिकार्‍यांनी (Bhusawal Sub Divisional Officer)   दिल्याचा दावा सभागृहात केला. या संदर्भात आमदार संजय सावकारे (MLA Sanjay Savkare) म्हणाले की, भुसावळातील प्रांताधिकार्‍यांनी (Bhusawal Sub Divisional Officer)  अनेक निर्णय बेकायदा घेतले असून ज्या बाबींचा त्यांना अधिकार नाही त्याबाबतही त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. 

  भुसावळातील (Bhusawal)  पारशी समाजाच्या जागेचा हस्तांतरणाचा प्रयत्न सुरू असून त्याबाब ज्यांनी कुणी व्यवहार केला असल्यास सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. या जागेतही गैरप्रकार होण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे. प्रांताधिकारी (Bhusawal Sub Divisional Officer)  सुलाणे यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrushn Vikhe Patil) यांनी केल्याची माहिती आमदारांनी दिली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️