जल जीवन मिशन अंतर्गत गावांना शाश्वत व सक्षम पाणीपुरवठा- गटविकास अधिकारी आर ओ वाघ.यांची माहिती

 


अमोल बैसाने (प्रतिनीधी) केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभाग , जलशक्ती मंत्रालय, नवीदिल्ली व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्दर्शन व अर्थसहाय्याने ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे पाणी मिळणेसाठी महात्वाकांशी जलजीवन मिशन कार्यक्रम राबविला जात आहे. गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट, पाणी पुरवठा कर्मचारी यांचे मध्ये क्षमता बांधणी होणेसाठी केंद्र शासनाने राष्ट्रविकास अग्रो एज्युकेशन संस्था, अमळनेर या संस्थेची निवड केलेली असून संस्थेने जल जीवन मिशन अंतर्गत भडगाव तालुक्यातील 49 ग्रामपंचायत मधील ग्रामस्तरीय भागधारकांसाठी दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम भडगाव येथे सुरु केलेला आहे .[ads id="ads1"]  

या कार्यक्रमाचे उद्घाटन भडगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.आर ओ वाघ व श्री सैदाणे सहाय्यक गट विकास अधिकारी, पं. स. भडगाव यांचे हस्ते करणेत आले. या प्रसंगी म. गटविकास अधिकारी यांनी जल जीवन मिशन हा केवळ पायाभूत सुविधां निर्मितीचा कार्यक्रम नसून शाश्वत व सक्षम सेवा पुरवठ्याचा आहे यासाठी गावांनी आपल्या पाणीपुरवठ्याचे स्रोत बळकट करावेत,  प्रति व्यक्तीला गुणवत्तापूर्ण स्वच्छ व शुद्ध असे ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. या मध्ये पुढील ३० वर्षाची लोकसंख्या वाढ विचारात घेऊन पाण्याचा आराखडा गावांनी करावयाचा आहे, जल जीवन मिशन मुळे ग्रामीण जीवन मानात सुधारणा होईल प्रत्येक कुटुंबांना कार्यान्वित नळ जोडणी द्वारे शुध्द व निरंतर पाणीपुरवठा होणार आहे इ विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. [ads id="ads2"]  

प्रशिक्षणामुळे ग्रामीण जनतेमध्ये जलजीवन मिशन कार्यक्रम विषयी जनजागृती होऊन नियोजन, अंमलबजावणी, देखभाल दुरुस्ती तसेच लोकवाटा जमा करणे मध्ये त्यांचा सहभाग वाढेल. सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरील म. पंकज आशिया मु.का.अ. जिल्हा परिषद जळगाव , श्री अनिकेत पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पणी व स्वच्छता विभाग, जि.प. जळगाव श्री सोनवणे समन्वयक, संस्थेचे अध्यक्ष श्री भूपेंद्र महाले, श्री तुषार महाले यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

प्रशिक्षण साठी तज्ञ प्रशिक्षक संजय बडगुजर, ज्ञानेश्वर पाटील, दीपक मोरे, अमोल बैसाणे प्रशिक्षण देत आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️