याबाबत सविस्तर वृत्त असे की, गंगापूर तालुक्यातील औरंगाबाद शहराजवळ असलेल्या वाळूज पंढरपूर एमआयडीसी जवळ असलेल्या घाणेगाव (संघर्ष नगर) येथील अनिकेत मधुकर सोनवणे यांना बाळू गायकवाड यांनी लग्नाची पत्रिका दिली असल्याने दिनांक 26 मार्च 2023 रोजी रविवारी लग्नासाठी घाणेगाव येथेच असलेल्या बुद्ध विहार मध्ये लग्नासाठी गेले होते. परंतु या ठिकाणी बाळू गायकवाड व अर्जुन गायकवाड त्यांचे दोन मित्र यांनी अनिकेत मधुकर सोनवणे यांच्यावर दगडफेक करून लाटी-काटीने मारहाण केली. परंतु त्यांनी लग्नाच्या ठिकाणावरून पळ काढल्याने त्यांची जिवंत जीवित हानी टळली. या लोकांसोबत अजून पंधरा ते वीस लोक अनोळखी सहभागी होते. अशी माहिती अनिकेत मधुकर सोनवणे यांनी बोलताना दिली.[ads id="ads2"]
तसेच ते पुढे म्हणाले की मला 26 मार्च 2023 रोजी मारहाण केली. परंतु माझ्या आईची तब्येत बरोबर नसल्याने व झालेला प्रकार पाहून मी घाबरून गेलो आणि कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. परंतु पुन्हा मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी पुन्हा बाळू गायकवाड व अर्जुन गायकवाड यांनी मला बुद्ध विहार जवळ गेलो असता माझ्या पाठीमागून येऊन मला मारण्यासाठी लाकूड फेकले त्या लाकडाचा आवाज आल्याने मी तेथून पळालो परंतु तरीदेखील त्यांनी व त्यांच्या मित्रांनी माझ्यावर दगडफेक केली. माझ्या पाठीला दगड लागला. तेव्हा देखील मी देखील मी पळाल्याने माझ्यावर होणारा मार टळला .
याबाबत दिनांक 29 मार्च 2023 रोजी बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनमध्ये बाळू गायकवाड, अर्जुन गायकवाड व त्यांचे दोन मित्र यांच्यावर भा.द. संहिता 1860 नुसार 323, 504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या तकरीमध्ये म्हटले आहे की, आरोपी बाळू गायकवाड, अर्जुन गायकवाड व त्यांचे दोन मित्र यांनी दिनांक 26 मे 2013 रोजी रविवारी चार वाजेच्या सुमारास आम्रपाली आम्रपाली बुद्ध विहार घाणेगांव येथे आरोपींनी फिर्यादी अनिकेत सोनवणे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली म्हणून एन सी गुन्हा दाखल पुढील कार्यवाही पोलीस हवालदार 1048 घुसळे यांच्याकडे दिल्या असून सदरचा प्रहार पत्र स्वरूपाचा असून फिर्यादीस माननीय न्यायालयात मागण्याची समज दिली. अशा प्रकारची करण्यात आली असून कार्यवाही कुठल्याही प्रकारची काळजी नाही. तरी अनिकेत मुलगा सोनवणे यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर जीवित हानी स्वरूपाचा प्रकार होऊ शकतो. तरी पोलिसांनी संबंधितावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सोनवणे कुटुंबीयांकडून करण्यात येत असून जर सोनवणे कुटुंबीयास कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली तर यास सर्वस्वी पोलीस प्रशासन राहील. जर आरोपीवर कठोर कारवाई न केल्यास आमरण उपोषणास बसू असे बोलताना माहिती दिली आहे. तरी पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन पुढील होणाऱ्या प्रकारास आळा घालावा. अशी मागणी संविधान आर्मी संघटनेतर्फे मागणी देखील करण्यात येत आहे. जीवघेणा हल्ला झालेला असेल आसतांना देखील पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे.