धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना उपदान अर्थात ग्रॅच्युइटीची रक्कम देण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहे. [ads id="ads1"]
अंगणवाडी सेवेतून निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना उपदानाची रक्कम मिळावी यासाठी विमलबाई पाटील यांनी कामगार न्यायालयात अॅड. सुभाष पाटील यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती. [ads id="ads2"]
निवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनिसांना निवृत्तीच्या दिवसापासून दरसाल दर शेकडा १० टक्के व्याजाने त्यांच्या शेवटच्या मानधनावर झालेल्या सेवाकाळानुसार उपदानाची रक्कम ४ आठवड्यात द्यावी, असे आदेश देण्यात आले आहे. या आदेशामुळे अंगणवाडी सेविकांना निवृत्त झाल्यावर व्याजासह एक ते दीड लाख रुपये तसेच मदतनिसांना सुमारे एक लाख रुपये मिळतील, अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर, कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिली.