रेल्वेच्या धडकेत निंभोरा येथील युवकाचा मृत्यू : निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

 

रेल्वेच्या धडकेत निंभोरा येथील युवकाचा मृत्यू : निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील निंभोरा बु (Nimbhora Taluka Raver) येथील रहिवाशी दगडु उर्फ आकाश ज्ञानेश्वर राजपूत वय - २६) या युवकास मध्य रेल्वेच्या निंभोरा ते रावेर (Nimbhora तो Raver) डाऊन लाईन वरील रेल्वे खांब क्र. ४६९/१२ ते १४ दरम्यान दिनांक ४ फेब्रुवारी संध्याकाळी ५:४२ वाजेच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत जबर मार लागून जागीच मृत्यू झाला. [ads id="ads1"]  

   मयत दगडु उर्फ आकाश ज्ञानेश्वर राजपूतचे वडील ज्ञानेश्वर भावसिंग राजपूत यांनी प्रेताची ओळख पटविली असता पंचांसमक्ष पंचनामा करून निंभोरा पोलीस स्टेशनला गुरनं २ / २०२३ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. [ads id="ads2"]  

 याबाबत निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी, पोलिस नाईक ईश्वर चव्हाण हे करीत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️