ट्रकचे चाक स्लीप झाल्याने टरबूज ने भरलेला ट्रक उलटला ; एक ठार तर सहा जण जखमी ; जखमींवर उपचार सुरू



जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) चोपडा तालुक्यातील वराड (Varad Taluka Chopda Dist Jalgaon) गावाच्या शेत शिवारात टरबूज भरून चोपडाकडे येत असताना शेतातील मातीवरून ट्रकचे चाक स्लीप झाल्याने अचानक एका बाजूला उलटला. या अपघातामध्ये ट्रकजवळ उभा असलेला साजीद मोहम्मद बागवान (३५, साने गुरुजीनगर, चोपडा जिल्हा जळगाव) हा ट्रकखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सहा मजूर गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत.[ads id="ads1"]  

घटनेचे वृत्त कळताच उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका, कर्मचारी, चोपड़ा नागलवाडी, वराड येथील अनेकजण घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य करून तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाजूला सारून केबिनच्या खाली दबलेल्या साजीद बागवान यास बाहेर काढले. ट्रकमध्ये बसलेले इतर ६ मजूरदेखील जखमी झाले आहेत. यामध्ये किरण मोरे (१७), लताबाई सोनवणे (३४), प्रवीण भिल्ल (२०), गणेश भिल्ल (१६), लताबाई भिल्ल (४०, रामपुरा, चोपडा), शफी फारूक बागवान (३४, केजीएन कॉलनी, चोपडा) यांचा समावेश आहे.[ads id="ads2"]  

मयत साजिद महमद बागवान हा अमजद खान तमीझ खान पठान ( मुस्तफा कॉलनी, चोपडा) यांच्या ट्रकवर (एमएच१८ / बीए३४८६) क्लिनर म्हणून काम करीत होता. तसेच गाडीवर चालक म्हणून शेख जाकीर शेख सलीम (पटवे अळी, चोपडा) असल्याचे समजते. साजीद बागवान हा वराड शिवारात टरबूज भरण्यासाठी ट्रकचालकासोबत गेला होता. 

हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार

हेही वाचा :- अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत ! येथून करता येणार अर्ज

गाडी टरबूजने भरून चोपडाकडे येत असताना ट्रक मातीच्या रस्त्यावरून स्लिप होऊन उलटला. त्यात क्लिनर साजीद बागवान हा गाडीखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाला. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री मदतीसाठी नगरसेवक हुसेनखा पठाण, मुक्तार सरदार, अकिल जहागीरदार, शकील शेख, साबीर शेख, कुणाल महाजन, सागर ओतारी, अक्षय साळुंखे, नाना बारेला, चंद्रजित राजपूत, महेंद्र धनगर यांनी सहकार्य केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️