मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी (Sukali Taluka Muktainagar) येथे ट्रकने दुचाकीला कट मारला. या अपघातात दुचाकीवरील चार वर्षांची मुलगी ठार झाल्याची घटना १४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. [ads id="ads1"]
याबाबत मीराबाई भरत विसावे (वय ३५,रा.मांडवे बुद्रुक ता.जामनेर) यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात (Muktainagar Police Station) फिर्याद दिली.
त्यात १४ फेब्रुवारीला दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुकळी गावाच्या रस्त्यावर ट्रक (क्रमांक RJ GA.८५०८) वरील चालक गिरधारीलाल मेघवाल (रा.राजस्थान) याने फिर्यादीचा मुलगा विजय हा चालवत असलेल्या दुचाकीला (क्रमांक MH-१९.DZ.९५५४) कट मारला. [ads id="ads2"]
त्यात अपघात होऊन फिर्यादीची भाची वेदिका अमोल तायडे (वय ४ वर्षे, रा. नांद्रा हवेली, ता.जामनेर) जिल्हा मागील चाकात येऊन गंभीर जखमी झाली. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गिरधारीलाल मेघवाल याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात (Muktainagar Police Station) गुन्हा दाखल झाला. पाेलिस त्याचा तपास करत आहेत.