विशेष प्रतिनिधी (हमिद तडवी) सोलापूर दिनांक 20/2/2023 सोलापुरात बिडी उद्योगातील काम करणाऱ्या सर्व विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापुरात विडी कारखाने मोठ्या प्रमाणात असून त्यात काम करणारे सुमारे 50 ते 60 हजार कामगार आहेत.[ads id="ads1"]
सदर कामगारांना फीस रेट प्रमाणे किमान वेतन दिले जाते सध्या सरकारी किमान वेतन अंदाजे 340 रुपये प्रमाणे आहे परंतु कारखानदार हे कामगारांना 200 रुपये प्रमाणे मजुरी १००० विड्या मागे देतात म्हणजेच किमान वेतनाची अंमलबजावणी केली जात नाही अशा प्रकारे गेल्या वीस वर्षापासून सुरू आहे वेळोवेळी महाराष्ट्र कामगार सेना व इतर समविचारी कामगार संघटनेने विडी उद्योग टिकला पाहिजे असा विचार करून किमान वेतनाबाबत तडजोडीचा करार केल्याप्रमाणेच मूळ मजुरी दिले जाते आणि त्यात महागाई भत्ता म्हणून वाढीचा करार केलेला मजुरीच्या अनुषंगाने (कॅल्क्युलेशन )गणना करून दिले जाते अशा प्रकारे कामगारांची लूट व अन्याय करीत आहे.[ads id="ads2"]
*तरी माननीय यांनी सोलापुरातील विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी मिळवून देऊन कामगारांना न्याय द्यावा ही नम्र विनंती असे नमूद करण्यात आले आहे विष्णु कारमपुरी(महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, राधिका इप्पा ,लक्ष्मीबाई इप्पा ,विठ्ठल कुराडकर ,गुरुनाथ कोळी,यांच्या सह विडी कामगार उपस्थित होते*
सोलापुरातील बिडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सरकारी कामगार अधिकारी श्री गायकवाड साहेबांना देताना विष्णू कारमपुरी (महाराज )रेखा अडकी ,राधिका इप्पा ,लक्ष्मीबाई इप्पा, विठ्ठल कुराडकर , आधी दिसत आहेत