सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे शासकीय विश्रामगृह समोर दि.२२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४-३० वा.दोन गटात भांडने होत असल्याची माहिती मिळाली असता सावदा पोलिस पथक घटनेची शाहनिशा करण्यास गेले असता शेख साबीर उर्फ बाबू शेख मंजूर,शेख गुलाम शेख मंजूर व रितेश संतोष पाटील,उल्हास कडून पाटील सह ७ ते ८ असे दोन गट एकमेकांशी झोंबाझोंबी करून मारामारी करित असल्याचे आढळून आले. [ads id="ads1"]
म्हणून पोलीसांनी सोडवासोडवी करीत असताना सदरील भांडनखोरांनी तुम्ही पोलिसांनी आमच्या भांडणात पडायचे नाही असे सांगून धक्काबुक्की करून ढकलून दिले. यावेळी पोलिसांनी केलेल्या आवानास न जूमानता पोलीस उपनिरीक्षक विनोद खांड बहाले यांचे उजव्या हाताच्या मनगटावर मारहाण केली.तसेच सार्वजनिक ठिकाणी सदरील दोन्ही गटचे तरुण मारामारी करून शांततेचा भंग करताना पोलिसांना मिळून आले.[ads id="ads2"]
सबब सदरील आरोपीतांविरुद्ध दी.२२ फेब्रुवारी रोजी रात्री १०-४९ वा.पो.ना.मोहसीन खान यांनी सावदा पोलिस ठाण्यात फिर्याद दील्यावरून गु.र.नं.३४/२०२३ भांदवीचे कलम ३५३,३३२,५०४,१६० अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून उल्हास कडून पाटील व शेख साबीर उर्फ बाबू शेख मंजूर यांना अटक केली असता त्यांना रावेर न्यायालयात आज हाजर केले असता या दोघांना २ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून शेख गुलाम शेख मंजूर यास देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.अशा प्रकारे दोन गटात झालेल्या हाणामारीची घटनामुळे शहराची शांतता आबादीत ठेवण्यासाठी शहरात सावदा,फैजपूर,निंभोरा येथील पोलिस कर्मचारी सह गृह रक्षक दल आणि उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे फैजपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप शिकारे मुक्ताईनगर,यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तरी पुढील तपास पोलीस निरीक्षक जालींदर पळे हे करीत आहे.