अवैध गौणखनिजाचा उपसा केल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील तीन जणांना २ कोटी १७ लाख रुपयाचा दंड ; कारवाईने परिसरात मोठी खळबळ


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) शासकीय परवाना न घेता आणि स्वामीत्वधनाची रक्कम बुडवून अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा केल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील तिघे जणांना रावेर महसूल (Raver Tahsil Office) प्रशासनाने जवळ जवळ २ कोटी १७ लाख रूपयांचा दंड ठोठावल्याने रावेर सह संपूर्ण रावेर तालुका (Raver Taluka) भरात मोठी खळबळ उडाली आहे. [ads id="ads1"]  

याविषयी सविस्तर वृत्त असे की, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे (Raver Taluka Tahsildar Usharani Devgune) यांनी सावदा हद्दीमधील गौणखनिज उपसा प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये सावदा शिवारातल्या (Savda Shivar) हद्दीत असणार्‍या गट क्रमांक १०५१ मधील बेला कैलास खंडेलवाल आणि शेख आशिक शेख निसार तसेच शेख अदनान शेख निसार या तिघांच्या नावांवर एकूण ०.७४ आर इतक्या क्षेत्रफळाची जमीन आहे.  [ads id="ads2"]  

  येथे अवैध माती आणि मुरूमाचा उपसा करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या अनुषंगाने महसूल प्रशासनाने तपासणी केली असता यात जवळ जवळ तब्बल १७५० ब्रास इतका मुरूम आढळून आला. या मुरुमाचा नियमानुसार पंचनामा करून याची मोजणी करण्यात आली होती. तर या संदर्भात संबंधीतांना नोटीसा बजावून त्यांचे कारण देखील जाणून घेण्यात आले होते.

हेही वाचा:- भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून‎ चार वर्षीय  बालिका ठार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

राज्य शासनाच्या निर्णयानुसार बाजारमूल्याच्या पाच पट रक्कम इतका दंड ठोठावण्यात येतो. सध्याचा मुरूमाचा बाजारभाव हा २२६४ रूपये प्रति ब्रास इतका आहे. या अनुषंगाने जप्त केलेल्या मुरूमाचे मुल्य हे जवळ जवळ १ कोटी ९८ लाख १४ हजार ८६८ इतके होते. यात स्वामीत्व धन आणि जळगाव जिल्हा खनिज प्रतिष्ठानसाठीचे एकूण मूल्य १९ लक्ष ८१ हजार ४८७ रूपये इतके जोडण्यात आले आहे. यातून एकूण २ कोटी १७ लक्ष ९६ हजार ९५५ रूपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे (Raver Taluka Tahsildar Usharani Devgune) यांनी याबाबतचे आदेश निर्गमीत केले आहेत. या घटनेमुळे रावेर तालुक्यासह संपूर्ण परिसरभरात महसूल खात्यातर्फे इतक्या मोठ्या रकमेचा दंड ठोठावण्याची ही कदाचित पहिलीच कारवाई असल्याने यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️