अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार

अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार


PM Kisan 13th Installment Released: पी.एम. किसान सम्मान निधी योजनेच्या लाभार्थींच्या संख्येबाबत सरकारने खूप कडक भूमिका घेतली आहे. अनेक लोक पीएम किसान योजनेसाठी अपात्र असल्याचे समोर येत असून या अपात्र लाभार्थ्यांना सातत्याने नोटिसा पाठवण्याची प्रक्रियाही सुरू आहे. आतापर्यंत या योजनेचे सर्व हप्ते त्यांच्याकडून परत मागितले जात आहेत. यादरम्यान १३ व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहितीअखेर समोर येत आहे.[ads id="ads1"]  

 पी.एम.  किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. चार महिन्यांच्या अंतराने २-२ हजार रुपये करून, ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले असून आता शेतकरी १३व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेचा १३वा हप्ताची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ती याच बातमी मध्ये खाली दिली आहे.[ads id="ads2"]  

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये १० लाख शेतकऱ्यांना १२वा हप्ता म्हणून सुमारे ८ कोटी रुपये जारी करण्यात आले. तर आता शेतकरी १३ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तो हफ्ता शेतकऱ्यांना २७ फेब्रुवारी रोजी थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण न केल्यास हप्त्याचे पैसे बंद होऊ शकतात. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले आहे, त्यांनी त्यांच्या स्थितीची तपासणी केली पाहिजे.

ऑनलाइन eKYC ची प्रक्रिया

पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.

वेबसाइटच्या उजव्या बाजूला असलेल्या eKYC च्या पर्यायावर क्लिक करा.

आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड भरल्यानंतर सर्च करा.

आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.

दिलेल्या कॉलममध्ये मोबाईलवर मिळालेला ओटीपी क्रमांक टाका.

यांनतर तुमचे eKYC अपडेट केले जाईल.

बायोमेट्रिकद्वारे केवायसी

जवळच्या CSC केंद्राला (कॉमन सर्व्हिस सेंटर) भेट द्या.

पीएम किसान खाते अपडेट करण्यासाठी आधार कार्ड द्या.

खात्यात लॉग इन करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत वापरा.

आधार कार्ड क्रमांक अपडेट केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.

यानंतर, केवायसी अपडेटची पुष्टी मोबाइलवर येईल आणि अशा प्रकारे ऑफलाइन केवायसी अपडेट होईल.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️