शिंदे- फडणवीस सरकार शेतकरी व गोरगरिबांचे विरोधी -- ॲड.संजय रोडे


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलवर तीव्र निदर्शने

 विशेष जिल्हा प्रतिनिधी (हमीद तडवी)   श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे पाटील, जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये आज दि‌.24 रोजी परळी येथील तहसील कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात आले.[ads id="ads1"]  

     यावेळी तहसीलदार परळी यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा सहसचिव ॲड.संजय रोडे यांनी या धरणे आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना सांगितले की, राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी व गोरगरिबांच्या हिताच्या विरोधी असून त्यांनी शेतकरी व गोरगरिबांच्या बाजूने भक्कम असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. यंदा कापूस हा मोठ्या प्रमाणात झाला असून शेतकऱ्यांना या पांढऱ्या सोन्यापासून योग्य भाव मिळेल अशी अपेक्षा असताना शासनाकडून कापूस अत्यल्प दरात खरेदी केला जात आहे. [ads id="ads2"]  

  तसेच गोरगरिबांच्या सर्वच योजना फक्त कागदोपत्री असून प्रत्यक्षात एकाही योजनेची अंमलबजावणी केली जात नाही. या उलट विजेचे भाव भरमसाठ वाढवून वेळेवर वीज पुरवठा ही केला जात नाही. राज्यात विजेचा लपंडाव ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे‌. शेतकऱ्यांना बांधावर वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याकारणाने शेतीला मुबलक पाणी नसताना वीज वसुली मात्र सक्तीने केली जात आहे. तरी राज्य शासनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या धरणे आंदोलनाद्वारे इशारा देण्यात येत आहे की, शेतकऱ्यांच्या कापसाला 12 हजार रुपये भाव तात्काळ देण्यात यावा व राज्यातील कोलमडलेली वीज यंत्रणा दुरुस्त करून विजेचे भाव तात्काळ कमी करण्यात यावेत. अन्यथा यापुढेही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्रस्वरूपाचे जन आंदोलन छेडले जाणार असल्याचेही ॲड. संजय रोडे यांनी सांगितले.

      या धरणे आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बालासाहेब जगतकर, तालुकाध्यक्ष गौतम साळवे, शहराध्यक्ष गफारशहा खान, युवक आघाडी तालुकाध्यक्ष राजेश सरवदे, एजाज भाई, शहर महासचिव विनोद रोडे, तालुका सचिव राजू भूतके, शहर उपाध्यक्ष संदीप ताटे, ज्ञानेश्वर गीते, शुभम सावंत, विजय झिंजुर्डे, दिनेश किरवले, केशव कांबळे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️