निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात चिमुरड्यांच्या नृत्याविष्काराने रंगले स्नेहसंमेलन...!

 


पाचोरा तालुका प्रतिनिधी(ईसा तडवी) नुकतेच निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे( प्ले ग्रुप,नर्सरी, ज्युनिअर के.जी, सिनियर के.जी.) वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय दिमागदार पद्धतीने संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निर्मल स्कूलच्या अध्यक्षा तथा निर्मल सीड्सच्या संचालिका आदरणीय सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी उपस्थित होत्या.प्रथमतः मुख्य अतिथी व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.[ads id="ads1"]  

    बालगोपालांच्या नृत्याविष्कारामध्ये एवढे नाविन्य होते की, समोर उपस्थित सर्व पालक व श्रोता वर्ग मंत्रमुग्ध झाला.विशेष म्हणजे पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनीच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सर्वांना आश्चर्यचकित केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा व विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेल्या संत गोरा कुंभार यांच्या जीवनातील प्रसंग चित्रकथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्काराने सर्व उपस्थितांना रोमांचित केले.[ads id="ads2"]  

शाळेच्या अध्यक्षा आदरणीय वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ज्या वयात विद्यार्थ्यांना आपली स्वतःची बॅग सांभाळता येत नाही अशा वयात ही मुलं स्टेज सांभाळत आहेत, उत्कृष्ट सादरीकरण करत आहेत असे सांगून पाचोरा व पंचक्रोशीसाठी हा विलोभनीय सोहळा म्हणजे सर्वांसाठी पर्वणीच आहे असे नमूद केले.

याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती. कमलताई पाटील, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी,प्राचार्य श्री. गणेश राजपूत,उपप्राचार्य श्री.प्रदीप सोनवणे, समन्वयक स्नेहल पाटील,पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख फरीदा भारमल,श्री संतोष पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. यशश्री जाधव हिने केले तर आभार कु. कुणाल पाटील याने अभिव्यक्त केलेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️