आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या तीन लेकरांना मायेचा मदतीच्या हाताची गरज



नांदगाव  प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) - नांदगाव तालुक्यातील कासार येथील काशाबाई मेंगाळ या महिलेचा सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे असलेल्या पाडळी गावातील राजाराम मंगळ आगिवले यांच्याशी विवाह साध्या पद्धतीने माळीच्या कार्यक्रमात झाला होता. संसाराची दोन चाकी सुरळीत चालू असताना त्यांना तीन मुली रेश्मा वय वर्षे 16, वसुंधरा वय वर्ष 11, अपेक्षा वय वर्षे 9 अशी अपत्य झाली होती. [ads id="ads1"]  

  परंतु येतील ते पटले नाही ‌ सुखी संसार सुरू असताना राजाराम मंगळ आगिवले दोन वर्ष पाठीचा मणका मोडल्यामुळे एकाच जागेवर बसून होते नंतर काही वर्षातच त्यांचा 5 जून 2016 रोजी मृत्यू झाला. अनिकेतूनच त्यांच्या पत्नीची काशाबाईची अधोगतीला सुरुवात झाली. परिस्थिती अतिशय बेताची असल्याने काशाबाई मेंगाळ हिने आठ ते दहा वर्षे मोलमजुरी करून आपल्या लेकरांना लहानचे मोठे केले. त्यांची मोठी मुलगी रेश्मा ही शाळेत जात असताना आपल्या आईला कामात हातभार लावत असायची. [ads id="ads2"]  

  परंतु मुलीचे शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे आई काशाबाईने रेश्माला घरीच ठेवून घेतले. काही दिवसांनी काशाबाईची भाग्याने त्यांची ही साथ सोडली. परिश्रम कष्ट करत असताना शरीराचा कस अक्षरशः निघून गेला. त्यांना दमाचाही आजार होता. आजारी पडून त्या अगदी का टिकत बारीक झाल्या होत्या. तीन दिवसापूर्वी आशाबाई ची तब्येत खानवली होती. चार-पाच दिवसापासून ना घरात मुलांना अन्न करून खायला घालायची तिची परिस्थिती. ना पैसे, अक्षयच्या तेल,ना मीठ फक्त भातावर आपल्या व लेकरांच्या पोटाला भर करत होत्या. गावाकडे जवळ नाही हॉस्पिटल ही गाडीची सोय. अशा कठीण दिवसात आठ दिवसापूर्वी तिची सोळा वर्षाची मुलगी रेश्मा हिने आपल्या आईला पायपीट करत हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन ठाणगावला किंवा हिवरे येथे रुग्णालय गाठायचे पण उपचारदरम्यान काशाबाई यांची दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी बुधवारी प्राणज्योत मावळली. प्रयत्न करूनही आई त्या लेकरांच्या हाती लागली नाही.

      काशाबाई हिचे भाऊ तीन दिवस आधीच आलेले होते. त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. आधी वडील गेले व आता आई देखील जग सोडून गेली. दोघांचेही छत्र हरपल्याने त्यांची तीन गोंडस मुली आता अनाथ झाली आहेत. वसुंधरा राजाराम आगिवाले ही मुलगी पाचवीपासून अपेक्षा राजाराम आगावले ही मुलगी दुसरीमध्ये शाळेत शिकत आहे. आई वडिलांचे छत्र हरपले असताना. आता सध्या नातेवाईक सात देताना दिसत आहेत. असे म्हणतात ना " सारं गाव मामाचं अन एक नाही कामाचं " पण तशी अजून काही दिसत नाही. सर्व नातेवाईक धावून येत आहेत. पण ते कायम त्यांच्यासाठी धावून येतील का? कधी दुर्लक्ष केले दिसून यायला नको म्हणून दुसरीकडे म्हणजे आपल्यासारख्याकडे मायेची आस लावलेली ही मुले कोणीतरी कोणत्याही सुरुवात मदत केली तर खूप बरे होईल. तसेच जनसेवा सेवाभावी संस्था ठाणगाव यांच्याकडून आई वडिलांचे छत्र हरपलेल्या लेकरांना मायेचा खास म्हणून मदत मिळावी अशीच अपेक्षा असून मायेचा व मदतीचा हात पुढे करत वनवासी मुलींना मदत होईल. आता सध्या येथील काही व्यक्ती तीनही मुलींचा सांभाळ करण्यास तयार आहेत. पण त्यांची परिस्थिती अतिशय गटाची आहे. व त्यांनाही मुले आहेत ‌ ते किती दिवस सांभाळ करणार. या लेकरांचा सांभाळ केला तरीसुद्धा त्यांना मदतीची खूप आवश्यकता आहे. म्हणून आजूबाजूच्या परिसरातील दानशूर व्यक्तीने पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जपत त्यांना मदत करावी असे संविधान आर्मी संघटनेच्या नांदगाव तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनंदा बागुल यांनी आवाहन केले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️