मुक बधीर महिलेचे वारसाचा शोध होण्यास जळगाव पोलसांकडून जनतेला आवाहन

मुक बधीर महिलेचे वारसाचा शोध होण्यास जळगाव पोलसांकडून जनतेला आवाहन

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) जळगाव जिल्हयांतील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या पोलीस स्टेशन हद्दीत एक मुक बधीर महिला एका लहान बाळासह दि. २३/०३/२०२२ रोजी मिळून आलेली असल्याने त्यांनी सदर मुकबधीर महिलेस व लहान बाळास शासकीय आशादीप महिला वसतीगृह, जळगाव येथे दाखल केलेले आहे.[ads id="ads1"]  

सदर मुक बधीर महिला ही ३५ ते ४० वयाची असुन तिचा रंग गोरा, शरिराने सडपातळ, उंची ५ फुट २ इंच, तिचे उजव्या हातावर रेवती हे नाव गोंदलेले असून डाव्या हातावर ठेरनीमो आजगीया असे गोंदलेले आहे. तिचे सोबतचे लहान बाळ हे सुमारे ३ वर्षाचे आहे.[ads id="ads2"]  

सर्व नागरिकांना मी श्री. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव आव्हान करतो की, वरील महिले संदर्भात जळगाव जिल्हयांतील हरविलेल्या व्यक्तीचे रेकॉर्ड पाहिले असता अशा वर्णना संदर्भात कोणतीही नोंद आढळून आलेली नाही. जळगाव जिल्हयांतील सर्व नागरिकांना वर नमुद महिलेस कोणी पाहिले असल्यास अगर ओळखत असल्यास तिचे वारसास सदर महिलेची माहिती देवून शासकिय आशादीप वसतीगृह, जळगाव या कार्यालयात संपर्क साधण्याबाबत कळवावे. तसेच आपण आपल्या परिसरातील मोबाईल Whataap वर, फेसबुक, इन्स्टांग्राफ व इतर सोशल मिडियावर सदर महिलेचा फोटो पाठविल्यास तिचे वारसांचा शोध लावून सदर मुक बधीर महिलेस तिचे वारसाच्या ताब्यात देण्यास मदत होईल. जळगाव जिल्हयांतील सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याबाबत आव्हान करण्यात येत आहे. 

संपर्क क्रमांक :-श्री. किसन नजनपाटील पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव मो.नं. ७३५०५१५८५८

कार्यालय नंबर ०२५७-२२२१७९०

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️