प्रवाशांनी हात दाखवूनही एस.टी.बस न थांबविल्या प्रकरणी रावेर एस.टी.डेपो चे चालक निलंबित

प्रवाशांनी हात दाखवूनही एस.टी.बस न थांबविल्या प्रकरणी रावेर एस.टी.डेपो चे चालक निलंबित


रावेर सुवर्ण दिप वृत्तसेवा) : प्रवाशांनी हात दाखवूनही बस न थांबविता त्यांच्याशी हुज्जत घालणार्‍या रावेर एस.टी.चालकाला (S T Driver) निलंबित करण्यात आल्याने कर्मचाऱ्याच्या वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. टी.आर.शेख असे निलंबन करण्यात आलेल्या रावेर आगारातील (Raver Aagar Depo) चालकाचे नाव आहे.[ads id="ads1"]  

महिला प्रवाशांशी चालकाने केले होते असभ्य वर्तन

भुसावळ येथून रावेरकडे (Bhusawal-To-Raver) येणार्‍या बसला (S T Bus) हात दाखवून ही चालकाने गाडी थांबवली नव्हती. सावदा (Savda Taluka Raver)येथे येत या महिला प्रवाशांनी चालक (S T Driver) टी. आर. शेख यांना याबाबत जाब विचारला असता त्याने या महिला प्रवाशांशी हुज्जत घालत उर्मट व असभ्य भाषा वापरल्याने चालकाची तक्रार जळगाव येथील विभागीय नियंत्रक यांच्याकडे करण्यात आली. याची तात्काळ दखल घेत रावेर डेपोचे चालक (Raver Depo ST Driver) टी. आर. शेख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.[ads id="ads2"]  

कर्मचार्‍यांच्या गोटात कारवाई ने खळबळ

सविस्तर वृत्त असे की, सोमवारी रावेर डेपोची बस नंबर 2398 ही भुसावळ येथून रावेरकडे (Bhusawal To Raver) येत असताना भुसावळ मधील गांधी पुतळ्याच्या जवळ काही महिला प्रवाशांनी बसला हात दाखवून थांबविण्याची विनंती केली मात्र चालक शेख मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असल्याने त्यांनी बस थांबवली नाही. मागून आलेल्या जळगाव-तांदलवाडी (Jalgaon To Tandalwadi) बसने या महिला सावदा (Savada) येथे आल्या. 

हेही वाचा :- सावद्यात दोन गटात हाणामारीत पोलीसांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल! 

हेही वाचा :- माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती उत्सव निमित्त सावद्यात भिमगीतांचे आयोजन  

त्यावेळी उभ्या असलेल्या बस चालक शेख यांना बस का थांबवली नाही अशी विचारणा केली असता शेख यांनी महिलांवर ओरडून त्यांचा अपमान केला. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर विभागीय नियंत्रक यांनी तत्काळ दखल घेऊन संबधीत चालक टी.आर.शेख यांना निलंबित केल्याने कर्मचारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️