गृप ग्रामपंचायत हर्णे पाजपंढरी मागणीनुसार कोल्हापूर कणेरी मठ बससेवा २० फेब्रुवारीपासून सुरू : सिद्धगिरी मठाकडे जाणाऱ्या भाविकांकरिता विशेष एसटी बससेवा

 

 दापोली:- गृप ग्रामपंचायत हर्णे पाजपंढरी ते कणेरी मठ ही बससेवा सुरु करण्याची मागणी महाव्यवस्थापक मा.श्री.शिवाजी जगताप,उप महाव्यवस्थापक मा.श्री.श्रीनिवास जोशी यांच्याकडे सिद्धगिरी मठाकडे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध नसल्याने अशी बससेवा सुरु करावी अशी मागणी करण्यात आली होती गृप ग्रामपंचायत हर्णे पाजपंढरी मागणीनुसार ही बससेवा २० फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येत आहे. [ads id="ads1"]  

           सदर बससेवा पाजपंढरी येथुन स.०९.३१ वा सोडण्यात येणार असून वाकवली,फुरुस,खेड,लवेल,लोटे,पर्शुराम,चिपळूण शिवाजी नगर,चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक,पोफळी,शिरगाव,कोयनानगर,पाटण,कराड,पेठनाका,कोल्हापूर येथून कणेरी मठ सां.५.४५ वाजता पोचेल परतीच्या प्रवासासाठी हि बससेवा रा.८.३१ वा  कणेरी मठ येथुन सुटणार आहे . [ads id="ads2"]  

     कणेरी मठ ते हर्णे पाजपंढरी या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाव्यवस्थापक वाहतुकचे मा.श्री शिवाजी जगताप,उप महाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी,प्रादेशिक वाहतुक अधिकारी सौ यामिनी जोशी,विभाग नियंत्रक प्रज्ञेष बोरसे,आगार व्यवस्थापक दापोली आगाराच्या सौ मृदुला जाधव,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले,गृप ग्रामपंचायत हर्णे पाजपंढरी ग्रामसेवक-सरपंच आदिनी केले आहे

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️